आजच्या धकाधकीच्या जीवनाचा विचार केला तर प्रत्येकाचा विमा असणे आणि त्यात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. परंतु काही विमा प्लानचे प्रीमियम महागडी असल्याने सर्वसामान्यांना ते परवडत नाही. म्हणून सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांनाही विम्याचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कमी प्रीमियम सह सुरू केले आहे.
या योजनेमध्ये पीएमएसबीवाय अंतर्गत संबंधित खातेधारकांना २ लाखांचा विमा मिळतो. कायमचे अपंगत्व आले तर १ लाख रुपयांची रक्कम मिळते. तुम्ही दर महिन्याला फक्त १२ रुपयांचा हप्ता भरून या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.
योजनेविषयी माहिती
पीएम एसबीवाय योजनेसाठी वयाची अट ही कमीत--कमी १८ जास्तीत जास्त ७० वर्ष निश्चित करण्यात आले आहे. परंतु महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खाते महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विमा घेणाऱ्याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास २ लाख रुपयांचा विमा मिळतो. कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास १ लाख रुपयांचे आर्थिक संरक्षण दिले जाते. सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगी ही योजना असल्याने तिचा फायदा घेणे फार महत्वाचे आहे. कारण या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त १२ रुपये आहे.
अर्ज कसा करावा?
सकाळच्या या महत्त्वाच्या योजनेमध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खातेधारक कोणत्याही बँकेमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.
लक्षात ठेवण्याजोगी गोष्टी
या योजनेसाठी वर्षाला १२ रुपये प्रीमियम जमा करावा लागतो. जर प्रीमियम वेळेवर गेला नाहीत तर पॉलिसी आपोआप रद्द होते. यामध्ये बँक खात्यातून प्रीमियम थेट ओटे बीट करण्याची सुविधा आहे. त्यामुळे खात्यावर पैसे असणे फार आवश्यक आहे.
Share your comments