दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बेरोजगार तरूणांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. दिल्लीत पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. आज केजरीवाल (Kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
सध्या बेरोजगारीची गंभीर समस्या आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत आपल्या सरकारने 12 ते 13 लाख तरुणांना रोजगार (Youth employment) दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. आता देखील पुढील 5 वर्षात किमान 20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे, असा निर्णय केजरीवाल यांनी घेतला आहे.
हे ही वाचा
पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान
याचबरोबर दिल्ली ही भारताची अन्नधान्याची राजधानी मानली जाते. जगभरातील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ दिल्लीत उपलब्ध आहेत. कुठे तिबेटी, कुठे चायनीज, कुठलेही पदार्थ खायला मिळतात. आता याचा आणखी विकास करण्याचा सरकार (govrnment) विचार करत आहेव. जेणेकरून रोजगार निर्मितीमध्येही भर होईल हा उद्देश ठेवला आहे.
हे ही वाचा
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय
फुड हबच्या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy Chief Minister Manish Sisodia) अनेक बैठका घेतल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले. आम्ही यासाठी एक डिझाईन स्पर्धा आयोजित करणार आहोत. जेणेकरून हे दोन फूड हब डिझाइन केले जातील. त्याचे काम पुढच्या 6 आठवड्यांत पूर्ण होईल. त्यांच्या अनुभवाच्या आधारे उर्वरित फूड हब विकसित केले जातील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे केजरीवाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे
Gas Cylinder! घरगुती गॅसच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या आजच्या किंमती
PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये
Share your comments