मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु सध्या परिस्थितीमध्ये घरांचे आणि जागांचे भाव गगनाला पोहोचल्यामुळे प्रत्येक नागरिकाला ते शक्य होत नाही. या अनुषंगाने मोठ्या शहरांमध्ये म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून घरांसाठी विविध प्रकारच्या गृहनिर्माण योजना राबवल्या जातात. या माध्यमातून बरेच नागरिक आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.
याचा अनुषंगाने आपण म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेचा विचार केला तर या अंतर्गत आता कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, ताडदेव, सायन, पवई, जुहू आणि गोरेगाव इत्यादी ठिकाणी बांधण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीच्या दृष्टिकोनातून सोडत काढण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
किती अर्ज झाले आहेत प्राप्त?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असून याकरिता तब्बल एक लाख वीस हजार 144 अर्ज पात्र ठरले असून या अर्जंमधून आता 4082 घरांकरिता सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती देखील अतुल सावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. मुंबई मंडळाच्या माध्यमातून 4082 सदनिकांमध्ये विविध गटातील घरांचा समावेश आहे.
जसे की प्रधानमंत्री आवास योजना( शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश असून प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे हे पहाडी गोरेगाव या ठिकाणी आहेत. या अंतर्गत 1947 सदनिकांसाठी 22472 अर्ज मिळाले आहेत.तसेच अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ८४३ सदनिका असून याकरिता 28 हजार 862 अर्ज मिळाले आहेत.
विशेष म्हणजे या उत्पन्न गटातील सर्वात जास्त अर्ज आहे कन्नमवार नगर विक्रोळी(415) योजने करता मिळाले आहेत. त्यासोबतच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिका असून याकरिता 60522 अर्ज मिळाले आहेत. याकरिता सर्वात जास्त अर्ज हे पहाडी गोरेगाव या योजनेकरीता आहेत.
तसेच मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज मिळाले आहेत. याकरता सर्वात जास्त अर्ज उन्नत नगर गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेकरिता मिळाले आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटातील 120 फ्लॅटसाठी 28 अर्ज मिळाले आहेत.
4082 सदनिकांच्या विक्रीकरिता या तारखेला होईल सोडत
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडेअकरा वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात येणार असून तिची वेळ ही सकाळी साडेअकरा वाजता असणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचे समोर आले आहे.
Share your comments