1. इतर बातम्या

Daily Horoscope: मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार

तुमच्या मनातल्या भावनिक आणि विश्वासाच्या मुद्द्यांवर नियंत्रण ठेवा. कामामुळे तुम्हाला जास्त थकवा येऊ शकतो, जो तुम्ही कदाचित गृहीत धरला नसावा. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट नसलात, तर ती सोडून द्या. आताचा काळ कोणाबद्दल किंवा कशाबद्दल थेट निष्कर्ष काढण्याचा नाही. वस्तुस्थिती तपासा.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

मेष

तुमच्या मनातल्या भावनिक (emotional) आणि विश्वासाच्या मुद्द्यांवर नियंत्रण ठेवा. कामामुळे तुम्हाला जास्त थकवा येऊ शकतो, जो तुम्ही कदाचित गृहीत धरला नसावा. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट नसलात, तर ती सोडून द्या. आताचा काळ कोणाबद्दल किंवा कशाबद्दल थेट निष्कर्ष काढण्याचा नाही. वस्तुस्थिती तपासा.

मिथुन

नशिबाची साथ मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या इच्छापूर्तीच्या दिशेचं हे पहिलं पाऊल असू शकेल. तुमचा सगळा संवाद साधा-सोपा आणि थेट मुद्द्याचा ठेवा. थोडी रिस्क असली तरी मागे-पुढे पाहू नका.

कर्क

तुम्हाला पुन्हा आत्मविश्वास आणि खात्री वाटेल. अशा वातावरणाचे संकेत आहेत. तुम्ही स्वतःला धाडसी समजू शकता आणि चाचणीच्या परिस्थितीत तुम्हाला ते सिद्ध करून दाखवावं लागेल. कुटुंबाला तुमच्या मोठ्या आधाराची गरज भासू शकेल. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या एकामागून एक सोडवल्या जातील.

कन्या

तुमच्या रूटीनमध्ये जे बदल असावेत असा विचार तुम्ही केला असेल त्यांचा समावेश रूटीनमध्ये करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी आणखी एक पैलू वाढेल. शेजाऱ्यांच्या भांडणांपासून दूर राहणं श्रेयस्कर.

'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम

तूळ

तुमचं पद आणि अधिकार यांचा कोणी तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करील. तुम्ही दक्ष राहायला हवं आणि संवाद नेमका, वस्तुनिष्ठ असायला हवा. छोटा किंवा मोठा बदल घडवण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात.

वृश्चिक

काही वेळा आपल्याला अगदी सामान्य गोष्टीमध्ये काही तरी असामान्य सापडतं. एखाद्या नामवंत संस्थेकडून तुम्हाला कामासाठी चांगला लीड मिळू शकेल. दुसऱ्या एखाद्या स्रोतातून उत्पन्न मिळवण्याची संधी तुमच्या मनात येऊन जाईल.

धनू

स्वतःला सर्वोत्तम क्षमतेने सादर करा आणि दिवसाचे प्राधान्यक्रम निश्चित ठेवा. दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या कामांकडे लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या जोडीदाराच्या शोधात असलात, तर तसा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळणार आराम; फक्त हे एकच काम करा

मकर

जीवनाच्या डायनॅमिक्समध्ये बदल होत आहेत. जुने पॅटर्न्स मोडले आहेत आणि नवे तयार होत आहेत. घडामोडींच्या काळात तुम्ही पाय घट्ट रोवून उभं राहण्याची गरज आहे. काही काळ अन्य कोणाला कर्ज देणं टाळा.

कुंभ

कठीण परिस्थिती किंवा कठीण ठिकाणी जाण्याचा रस्ता तुम्ही तयार करण्याची शक्यता आहे. सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीमुळे तुम्हाला थोडंसं दमल्यासारखं आणि वैतागल्यासारखंही वाटण्याची शक्यता आहे. थोडी विश्रांती खूप गरजेची आहे.

मीन

परदेश प्रवासाचे प्लॅन्स तुम्ही करत आहात. त्यासाठी आता चांगला काळ आहे. नामवंत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलात, तर आता शक्यता कमी आहे. तुमच्या गरजा सोप्या करा, जेणेकरून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्या पूर्ण करणं तुम्हाला शक्य होईल.

महत्वाच्या बातम्या 
महत्वाची बातमी! IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती केल्या जाहीर
LIC ने लॉन्च केली सर्वोत्तम पॉलिसी; वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपये पेन्शन
शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न

English Summary: Daily Horoscope Gemini Pisces Virgo good opportunities Luck help Published on: 08 October 2022, 06:02 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters