1. इतर बातम्या

Petrol-Disel Update: कच्च्या तेलाच्या भावात यावर्षीचा उच्चांकावरून 20% घसरण, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील?

कच्च्या तेलाच्या किमती या वर्षातील सर्वोच्च पातळी पासून जवळपास वीस टक्क्यांनी घसरले आहेत. मंगळवारी क्रुडच्या दरात मोठी घसरण झाली. भारतासाठी ही बातमी चांगली असून भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crude oil prices decrese in international market

crude oil prices decrese in international market

 कच्च्या तेलाच्या किमती या वर्षातील सर्वोच्च पातळी पासून जवळपास वीस टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मंगळवारी क्रुडच्या दरात मोठी घसरण झाली. भारतासाठी ही बातमी चांगली असून भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो.

स्वस्त कच्च्या तेलामुळे आयात खर्च कमी राहतो. क्रुड महाग झाले की आयात बिल वाढते. मंगळवारी ब्रेन्ट क्रुड 7.1 टक्क्यांनी घसरून 99.49 डॉलर प्रति बॅरल वर आले. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट देखील 7.9 टक्क्यांनी घसरून 95.84 डॉलर प्रति बॅरलवर  आले.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेन वर केलेल्या हल्ल्यानंतर क्रूडच्या किमतीत वाढ झाली होती. क्रूड च्या किमती घसरण्यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीचा अंदाज आहे. जर असे झाले तर क्रूडची मागणी कमी होईल.

तसेच चीन मध्ये कोरोणा चे नवीन उपप्रकार आल्याने पुन्हा निर्बंध वाढवले जात आहेत. जर चीनमध्ये कोरोना चा संसर्ग वाढला तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकते.

त्यामुळे तेथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले तर क्रूड तेलाची मागणी देखील कमी होईल. चीन हा जगातील सर्वात जास्त कच्च्या तेलाचा वापराचा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

नक्की वाचा:शेतीच्या पाण्याचा ताण मिटला! पाऊस आला एक दिवस परंतु 'या' जिल्ह्यातील धरणे झाले तुडुंब,19 धरणे 50 टक्क्यांच्या वर

कच्च्या तेलाच्या किमती भविष्यामध्ये कमी होणार की वाढणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात प्रसिद्ध ऊर्जा तज्ञ नरेंद्र तनेजा म्हणतात की, कच्च्या तेलाच्या किमतीत फारशी घसरण अपेक्षित नाही.

ते म्हणाले की येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल 95 ते 115 डॉलर या श्रेणीत राहू शकतात. तसेच पुढे ते म्हणाले की, अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठी मंदी येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

नक्की वाचा:नियमित कर्जदारांना 50 हजार अनुदान मिळालेच पाहिजे यासाठी सांगली येथे भव्य मोर्चा

जर क्रूडच्या किमती 100 डॉलरवर गेल्या तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा वाढली आहे.

भारतात इंधनाचे दर बऱ्याच काळापासून शंभर रुपये प्रति लिटर च्या आसपास स्थिर आहेत. काही राज्यांमध्ये शंभर रुपयांच्या पुढे पेट्रोल विकले जात आहे.

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे का असे विचारले असता, तनेजा म्हणाले की, ते अद्याप अपेक्षित नाही.

पुढे ते म्हणाले की, यासाठी कच्च्या तेलाच्या किमती किमान एक महिना खालच्या पातळीवर राहणे आवश्यक आहे. असे झाल्यानंतरच देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आपण करू शकतो.

नक्की वाचा:आता महागाई आणि गॅस भरून आणायची चिंता मिटली! सोलर कुकिंग शेगडी लॉंच

English Summary: crude oil prices decrese in international market so can effect on petrol disel price Published on: 13 July 2022, 03:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters