1. इतर बातम्या

देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढत आहे, RBI च्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

देशात बनावट नोटांचे चलन वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात बनावट नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २०२१-२२ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०१.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर २००० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये ५४.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Counterfeit notes are on the rise in the country, according to RBI reports

Counterfeit notes are on the rise in the country, according to RBI reports

देशात बनावट नोटांचे चलन वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात बनावट नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, २०२१-२२ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०१.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर २००० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये ५४.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. RBI ने दिलेल्या या अहवालामुळे एकच खळबळ माजली आहे.

भारत कॅशलेस पेमेंटच्या वाढत्या ट्रेंडकडे वाटचाल करत आहे, सध्या अनेक माध्यमातून कॅशलेस व्यवहार केले जाता आहेत, परंतु आज रोख व्यवहारांसाठी १०० रुपयांच्या नोटेला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, २००० रुपयांच्या नोटांना व्यवहारांसाठी सर्वात कमी पसंती दिली जाते, तर ५०० रुपयांच्या नोटांचा सर्वाधिक वापर केला जातो.

Times Now च्या अहवालानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८७.१ टक्के होता, जो ३१ मार्च २०२१ पर्यंत ८५.७  टक्के होता. व्हॉल्यूमच्या बाबतीत, सर्वात जास्त वाटा ३१ मार्च २०२२ रोजी ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ३४.९ टक्के होते. त्यानंतर १० रुपयांच्या नोटा आल्या, ज्या एकूण नोटांच्या २१.३ टक्के होत्या.

१०, २०, २००, ५०० (नवीन डिझाइन) आणि २००० च्या बनावट नोटांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे १६.१४%, 16.5%, ११.७%, १०१.९% आणि ५४.६% वाढ झाली आहे. त्याच वेळी, ५० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये २८.७ टक्क्यांनी आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १६.७ टक्क्यांनी घट झाली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून २००० रुपयांच्या नोटांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

या वर्षाच्या मार्च अखेरीस, एकूण चलनी नोटांमध्ये त्यांचा वाटा २१४ कोटी रुपये किंवा १.६ टक्के होता. या वर्षी मार्चपर्यंत, सर्व मूल्यांच्या एकूण नोटांची संख्या 13.०५३ कोटी होती. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा १२४३७ कोटी होता. आरबीआयच्या अहवालानुसार, मार्च २०२२ अखेर चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांची संख्या २७४ कोटी होती. हा आकडा चलनात असलेल्या एकूण नोटांच्या २.४ टक्के होता.

महत्वाच्या बातम्या
यंदा 42 हजार कोटींची एफआरपी FRP, विक्रमी गाळपामुळे विक्रमी वाढ

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना एफआरपी पोटी मिळेल 42 हजार कोटींच्या आसपास रक्कम

English Summary: Counterfeit notes are on the rise in the country, according to RBI reports Published on: 29 May 2022, 12:41 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters