1. इतर बातम्या

पीएम किसान योजनेच्या अर्जातील चुका करा दुरुस्त; नाहीतर होईल तोटा

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) अंतर्गत शेतकऱ्यास वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

KJ Staff
KJ Staff


केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (पीएम किसान सन्मान निधी योजना) अंतर्गत शेतकऱ्यास वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत ही रक्कम २-२ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सरकारने आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आता लवकरच किसान योजनेचा सातवा हप्ता (पंतप्रधान शेतकरी योजना) मिळणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान किसान योजना : आता केवळ 'या' शेतकऱ्यांनाच मिळेल सातवा हप्ता 

आपण अर्ज केला असेल किंवा अर्ज केल्यावर तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेच्या (पीएम किसान योजनेच्या) पूर्वीच्या हप्त्यातून पैसे मिळालेले नाहीत. तर आपल्या अर्जात काही त्रुटी असू शकतात. बहुतांश घटनांमध्ये असे दिसून येते की प्रधानमंत्री किसान योजनेत हप्ता न मिळण्याचे कारण अर्जदाराची योग्य माहिती न देणे हेच आहे.बऱ्याचदा असे दिसून आले आहे की, अर्जदारांनी  आपला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि नावाच्या शब्द लेखनात चुका केल्या आहेत. यामुळे आपल्या खात्यात पैसे आले नाहीत. पण शेतकरी मित्रांनो यात घाबरण्याची गरज नाही. कारण चुका आपण स्वत दुरुस्त करू शकतात.यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेच्या पोर्टेलच्या हेल्पडेस्क वर जावे लागेल आणि आपण आपल्या चुका दुरुस्त करु शकतात.यामुळे सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्यापासून आपली सुटका होणार आहे. हेल्पडेस्कवर क्लिक करून तुम्ही आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर अपडेट करू शकतात. तसेच अर्जात नोंद केलेली कोणतीही इतर चूक दुरुस्त करण्यास आपल्याला मुभा आहे.

पंतप्रधान किसान योजना फॉर्म २०२० सुधारित करण्याची प्रक्रिया-

  • प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आपल्या स्क्रीनवर एक वेब पृष्ठ दिसून येईल.
  • मेनू बारवरील किसान शेतकरी टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन सूचीतील शेतकरी तपशील संपादित करा पर्यायावर क्लिक करा. आपला आधार क्रमांक आणि संबंधित फील्डमध्ये कॅप्चा कोड नमूद करा.
  • शोध बटणावर क्लिक करा. पुढील माहिती अपडेट करा.

English Summary: Correct the mistakes in the application of PM Kisan Yojana, otherwise there will be loss Published on: 14 October 2020, 04:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters