1. इतर बातम्या

रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया

कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने गरजू लोकांसाठी मोफत रेशन वाटप सुरू केले होते. अजूनही केंद्र सरकारकडून सर्वांना धान्य मिळावे म्हणून योजना सुरूच आहे. मात्र आता याविषयी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जी तुम्हाला ताबडतोब सुधारणा करावी लागणार आहे,

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
ration card update

ration card update

कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने (central government) गरजू लोकांसाठी मोफत रेशन वाटप सुरू केले होते. अजूनही केंद्र सरकारकडून सर्वांना धान्य मिळावे म्हणून योजना सुरूच आहे. मात्र आता याविषयी एक महत्वाचे अपडेट आले आहे. जी तुम्हाला ताबडतोब सुधारणा करावी लागणार आहे,

तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि तुम्हाला सरकारी रेशन कोणत्याही अडचणीशीवाय मिळत राहावे असे वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी आहे. सरकार गरीब आणि गरजू लोकांना खूप कमी किमतीत मोफत रेशन पुरवते

मात्र आता रेशनकार्डधारकांना (ration card) त्यांच्या रेशनकार्डमध्ये नवीन सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा रेशनकार्डद्वारे मिळणारे रेशन मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतील. जर तुमचा मोबाईल नंबर रेशनकार्डमध्ये अपडेट नसेल तर ते त्वरित पूर्ण करा. रेशनकार्डमध्ये जुना किंवा चुकीचा क्रमांक टाकला असल्यास तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागेल.

दिलासादायक बातमी! सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे

महत्वाचे म्हणजे रेशन कार्डमधील (ration card) योग्य नंबर अपडेट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्डशी संबंधित कोणतेही अपडेट तुम्हाला घरबसल्या तुमच्या फोनवर मिळेल. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना नंबर अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. तुम्ही घरबसल्याही ऑनलाइन अपडेट करू शकता.

तुमच्या चालण्यावरून तुमचे तारुण्य ठरत असते; अशाप्रकारे चाललात तर तारुण्य राहील कायम

ऑनलाइन अपडेट असा करा

प्रथम तुम्ही अधिकृत लिंकवर जावा https://nfsa.gov.in/state/mh

लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढे आधार कार्ड क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक, रेशनकार्डमध्ये लिहिलेले कुटुंबप्रमुखाचे नाव आणि नवीन मोबाइल क्रमांक भरा.

त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला कॅप्चा (capcha code) कोड भरा आणि सेव्ह बटणावर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर तुमचा नवीन क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेवर अपडेट करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन
रेल्वे स्टेशनवर होणार आधार कार्ड संबंधित महत्वाची कामे; UIDAI ने आखली मोठी योजना
ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जमा करा फक्त 95 रुपये; 14 लाख रुपयांचा होईल फायदा

English Summary: continue ration card update information immediately Published on: 25 September 2022, 05:10 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters