Mirabai Chanu Wins Gold: भारतासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मीराबाई चानूने (Mirabai Chanu) कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (CWC 2022) भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
चानूने 49 किलो वजनी गटात ही सुवर्ण कमाई केली आहे. भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने बर्मिंगहॅम (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. (gold medal)
मीराबाई चानूची रेकॉर्डब्रेक कामगिरी
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूची 'गोल्डन' कामगिरी केली आहे. महिलांच्या 49 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे. त्याने एकूण 201 किलो वजन उचलून विक्रमी सुवर्णपदक जिंकले. चानूने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आणि खेळाचा विक्रमही केला.
हे ही वाचा: CWG Sanket Sargar Silver Medal: मराठमोळ्या 21 वर्षीय 'बाहुबली' संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक
दुसऱ्या दिवशी भारताची सर्वोत्तम कामगिरी
1. वेटलिफ्टिंग - मीराबाई चानूने महिलांच्या ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले
2. वेटलिफ्टिंग - संकेत सरगरने भारतासाठी रौप्य पदक जिंकले
3. वेटलिफ्टिंग - गुरुराजा पुजाराने 61 किलो गटात कांस्यपदक जिंकले
4. बॅडमिंटन - भारताने श्रीलंकेवर 5-0 ने मात केली
5. टेबल टेनिस - भारतीय महिला संघाने गयानाचा 3-0 असा पराभव केला
6. मुष्टियुद्ध - हुसम उद्दीन मोहम्मदने दक्षिण आफ्रिकेच्या अमझोल दीयीला 5-0 ने पराभूत केले
7. टेबल टेनिस - भारतीय पुरुष संघाने उत्तर आयर्लंडचा 3-0 असा पराभव केला.
हे ही वाचा: केंद्र सरकार खासगी नोकरदारांसाठी घेणार मोठा निर्णय; आणणार नवीन कायदा..
Share your comments