सीएनजी गॅसची मागणी वाढत आहे. पण, स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. एक एप्रिल पासून सीएनजीच्या दरात वाढच होत आहे. शहरात पूर्वीच सीएनजी ९१ रूपयांवर गेला होता.
पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये रविवारी मध्यरात्रीपासून चार रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 88.66 डॉलरवर; पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय झाला बदल; जाणून घ्या नवे दर...
काही दिवसांपूर्वी एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता एका किलोसाठी ८७ रूपये द्यावे लागत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून एक किलो सीएनजीसाठी ९१ रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीचे दर वाढल्यामुळे वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे.
Share your comments