भारतात आधार कार्ड एक प्रमुख दस्ताऐवज आहे. आधार शिवाय कुठलेच सरकारी काम हे पूर्ण होत नाही. आधार कार्ड बँकिंग कामापासून ते अनेक महत्वाच्या कामात उपयोगी पडते. आधार कार्डची उपयोगिता हि आपण सर्वाना चांगलीच ज्ञात आहे.
हेच कारण आहे की आधार कार्डचा दुरुपयोग टाळता यावा ह्यासाठी आपल्याला सजग राहणे महत्वाचे ठरते. दुरसंचार विभागाने आपले आधार सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी नुकतेच एक अपडेट आणले आहे. ह्या सेवेचा लाभ घेऊन आपण जाणुन घेऊ शकतो की आपले आधार कार्ड चुकीचे अथवा नकली तर नाही ना, शिवाय याव्यतिरिक्त आपण हे देखील जाणुन घेऊ शकतो की आपले आधार कार्ड हे कुठे कुठे आणि कोण कोणत्या लोकांद्वारे वापरले जात आहे. ह्या सुविधेचा वापर करून आपण सहज हे जाणुन घेऊ शकतो की आपल्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर अर्थात सिमकार्ड रजिस्टर आहेत.
DoT ने अलीकडेच टेलिकॉम ऍनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) नावाचे पोर्टल सुरू केले आहे, जे लोकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासण्यास मदत करेल. तुम्ही जर रजिस्टर असलेला सिम नंबर वापरत नसाल, तर तुम्ही ते डिस्कनेक्ट देखील करू शकता.
TAFCOP ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, वेबसाइट हि ग्राहकांना सर्व प्रकारची मदत करेल. व्यक्तींच्या नावावर कार्यरत मोबाइल कनेक्शनची अर्थात सिम कार्डची संख्या तपासेल आणि अतिरिक्त मोबाइल कनेक्शन म्हणजेच सिम कार्ड हे डिस्कनेक्ट देखील करेल.
तुमच्या आधार नंबरवर किती सिमकार्ड आहेत असं करा चेक
»तुमच्या आधार नंबर वर किती सिम कार्ड चालू आहेत हे तपासण्यासाठी, सर्व्यात आधी टेलिकॉम ऍनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट आणि कंझ्युमर प्रोटेक्शन पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. https://tafcop.dgtelecom.gov.in/ हि ऑफिसिअल वेबसाइट आहे.
»आता तुमचा मोबाईल क्रमांक विचारला जाईल तो व्यवस्थितपणे प्रविष्ट करा.
»त्यानंतर 'रिक्वेस्ट ओटीपी ' या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
»आता मोबाईल वर प्राप्त झालेला ओटीपी विचारलेल्या रकान्यात न चुकता प्रविष्ट करा.
»त्यानंतर, तुमच्या आधार क्रमांकावर रजिस्टर असलेले सर्व क्रमांक वेबसाइटच्या पेजवर पाहता येतील.
»या क्रमांकांवरून, आपण त्या क्रमांकांचा तपशील पाहू शकता. तसेच जो नंबर वापरत नाही आहात तो नंबर ब्लॉक देखील करू शकता.
Share your comments