मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी केवायसी च्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकी पासून सावध होण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात सर्व कंपन्यांनी ऍडव्हायझरी जारी केली आहे.
यामध्ये सर्वप्रथम एअरटेलने फसवणूक करणाऱ्या नवीन तंत्रं याबाबत माहिती दिली होती. याबाबतीत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सर्व ग्राहकांना उद्देशून एक पत्र लिहिलेआहे.त्यांनी वापर करताना कसे फसवले जाते याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून लोकांचे वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करतात.
.आता एअरटेल पाठोपाठ वोडाफोन आयडिया नेदेखील एक ऍडव्हायझरी जारी केली आहे.संबंधित फसवणूक करणाऱ्या ग्राहकांना कसे टार्गेट करतात याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की अज्ञात नंबर वरून एसएमएस आणि कॉल करण्यात येतात. क्या कॉलमध्ये ग्राहकांना त्वरित केवायसी अपडेट करण्यास सांगण्यात येते. केवायसी अपडेट न केल्यास सिम ब्लॉक करण्याची धमकी दिली जाते.
अशी होते फसवणूक
या मध्ये कॉल करणारे व्यक्ती स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी सांगतात.यामध्ये कॉल किंवा एसएमएस द्वारे पूर्ण केवायसी फॉर्म भरण्यास सांगण्यात येतो. त्यानंतर गुगल प्ले स्टोर वरून क्विक सपोर्ट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. या ॲपच्या माध्यमातून स्कॅनर्स कडे तुमच्या फोनची पूर्ण नियंत्रण येते. ते बँकिंग पासवर्ड सर्व महत्वपूर्ण माहिती गोळा करून बँकेतून पैसेहीचोरू शकतात.
त्यामुळे ग्राहकांनी असल्या कुठल्याही एसएमएस आणि फोन कॉल्सला बळी पडू नये.सावधानता ठेवावी.
Share your comments