देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असल्याचे बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आगामी काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता आहे कारण की रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धापोटी कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा भडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खपत वाढली आहे. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहन सीएनजी वाहनांच्या तुलनेत महागडे असल्याने सीएनजी वाहन खरेदी करण्यासाठी लोक आता उत्सुक असल्याचे बघायला मिळत आहे.
मित्रांनो जर आपण सीएनजी कार खरेदी करू इच्छित असाल तर आज आम्ही आपल्यासाठी दमदार मायलेज देणार्या आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या CNG गाडीची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
हेही वाचा:-खरं काय! 'या' ठिकाणी फक्त दीड लाखात मिळतेय सेकंड हॅन्ड Maruti WagonR; जाणून घ्या या दमदार ऑफरविषयी
Maruti Suzuki Alto:- मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. या कंपनीचे अल्टो हे सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीच्या या हॅचबॅक कारमध्ये 0.8-लिटर इंजिन दिले गेले आहे. मारुती सुझुकी अल्टो CNG मध्ये देण्यात आलेले इंजिन 40 PS पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. मारुती सुझुकी अल्टो सीएनजी 31.59 किलोमीटर प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. अल्टो या हॅचबॅक कारचे CNG व्हेरियंट मॉडेलची एक्स शोरूम किंमत 4 लाख 56 हजार ते 4 लाख 60 हजार यादरम्यान आहे.
Hyundai Santro:- Hyundai ही देखील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कंपनी आहे. या कंपनीची Santro ही कार कंपनीची बेस्ट सेलिंग कार आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या CNG कारमध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 60 PS पॉवर आणि 85 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. असं सांगितले जातं की, Santro CNG 30.48 किलोमीटर प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या Santro CNG कारची एक्स शोरूम किंमत किंमत 5 लाख 92 हजार ते 6 लाख 06 हजार रुपये यादरम्यान आहे.
हेही वाचा:-लई भारी! फक्त 50 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti Alto CNG; जाणून घ्या या ऑफर विषयी सविस्तर
WagonR CNG:- मारुती सुझुकी कंपनीची WagonR ही कार देखील CNG मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या WagonR मध्ये 1.0-लिटर तीन-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे की 57 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असते. WagonR CNG कार 32.52 km/kg मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. CNG WagonR ची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 60 हजार ते 5 लाख 67 हजार यादरम्यान आहे.
हेही वाचा:-फक्त 5 लाख रुपयात उपलब्ध आहेत या दोन 7 सीटर कार; जाणुन घ्या याविषयी
Share your comments