लष्कर भरतीसाठी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशामध्ये विरोध होत असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परंतु असे असून देखील केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला
असून त्यानुसार अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सेवेत चार वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्नि वीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मधील भरतीत 10% रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे.
तसेच या दोन्ही दलामध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादा पेक्षा तीन वर्षे वयाची सूट दिली जाईल. अग्नि वीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे पाच वर्षासाठी वयोमर्यादा शिथिल असेल असे देखील केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेत नव्याने भरती होणार यासाठी प्रवेशाची वयोमर्यादा सतरा वर्षे सहा महिने ते 21 वर्षे अशी निश्चित करण्यात आली होती.
परंतु गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्यामुळे त्याची दखल घेत सरकारने 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयोमर्यादेत सूट देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता 2022 अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्ष करण्यात आली आहे.
देशभरात या योजनेला विरोध
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
अशातच वयोमर्यादेत वाढ केल्यामुळे तरुणांनी येणाऱ्या लष्कर भरती कडे लक्ष द्यावे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच केले.काही दिवसांमध्ये लष्कर भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशा तरुणांनी त्यांची तयारी सुरू करण्याचे आव्हान देखील त्यांनी केले.
नक्की वाचा:महिलांना मिळणार शिलाई मशीन मोफत; केंद्र सरकारच्या या योजनेसाठी अर्ज करा
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने या वर्षी लष्कर भरतीची वयोमर्यादा 21 वरुन 23 पर्यंत वाढवल्याने अनेक तरुण अग्निविर बनण्यास पात्र ठरतील. योजना तरुणांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेच्या जुळवण्याची तसेच देशसेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त करून देईल.
असे देखील राजनाथ सिंह म्हणाले. गेल्या दोन वर्षापासून लष्कर भरती प्रक्रिया राबवण्यात आली नसल्यामुळे या योजनेमुळे अनेक युवकांना लष्करात भरती होण्याची संधी मिळेल असे देखील राजनाथ सिंह म्हणाले.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर मोदी सरकार देतंय 50 टक्के अनुदान; आजच घ्या लाभ
Share your comments