1. इतर बातम्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने लोकसभेत दिले 'हे' स्पष्टीकरण, वाचा महत्वाची बातमी

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत काही बातम्या सातत्याने येत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात महागाई भत्ता कधी मिळणार याबाबत देखील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे केंद्रसरकारी कर्मचारी बऱ्याच प्रकारे गोंधळात पडल्यासारखे वातावरण आहे. परंतु आता स्वतः केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि 8 वा वेतन आयोग याबाबत लोकसभेत स्पष्टीकरण दिले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
update on 8th pay commission

update on 8th pay commission

 मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आठव्या  वेतन आयोगाबाबत काही बातम्या सातत्याने येत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात महागाई भत्ता कधी मिळणार याबाबत देखील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे केंद्रसरकारी कर्मचारी बऱ्याच प्रकारे गोंधळात पडल्यासारखे वातावरण आहे. परंतु आता स्वतः केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि 8 वा वेतन आयोग याबाबत लोकसभेत स्पष्टीकरण दिले आहे.

नक्की वाचा:7th Pay Commission: DA वाढविण्याबाबत सरकारकडून मोठी अपडेट; जाणून घ्या

लोकसभेत दिलेले स्पष्टीकरण

 सरकारचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेमध्ये एका लेखी उत्तरात स्पष्ट करून दिले आहे की, सध्या आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. असे त्यांनी लिखित उत्तरात स्पष्टपणे म्हटले आहे.

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, 8 व्या वेतन आयोगाचे गठन करण्याचे अजून कुठल्याही प्रकारचा विचार नसून सध्या तरी आठवा वेतन आयोग गठित करता येणार नाही.

नक्की वाचा:7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन भेट; डीएमध्ये 'एवढी' टक्केवारी निश्चित!

पुढे त्यांनी म्हटले की 2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाचे गठन करण्यात आले होते व त्यासोबतच 2016 पासून 7 वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी लागू केला होता. या सातव्या वेतन आयोगानुसार सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा देण्यात येणार होता.

 महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ शक्य

आपण सध्याच्या नियमांचा विचार केला तर त्यानुसार एआयसीपीआय इंडेक्स च्या आधारावर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता  हा वाढवण्यात येईल. आपण सध्याच्या महागाई भत्त्याचा विचार केला तर तो 34 टक्के असून  आता या इंडेक्सच्या आधारे महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणे शक्य आहे.

नक्की वाचा:Post Office Scheme: गुंतवणूकदारांची होणार बल्ले-बल्ले..! पोस्टात फक्त 333 रुपये गुंतवा, अन मिळवा तब्बल 16 लाख

English Summary: central goverment give explanation in lok sabha on 8th pay commiossion Published on: 10 August 2022, 10:19 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters