
goverment can collect intrest ammount in pf holders account
भविष्य निर्वाह निधी ही कर्मचाऱ्यांचा एक मोठा आधारस्तंभ असतो. आर्थिक दृष्टीने विचार केला तर पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांना कुठल्याही तातडीच्या आर्थिक निकड भागवण्यासाठी मदत करते. त्यासाठी आपल्याला माहित आहेच की, प्रत्येक नोकरी करणाऱ्याचे पीएफ अकाऊंट असते व प्रत्येकाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात यूएएन नंबर दिलेला असतो व हाच नंबर आपला पीएफ अकाउंट नंबर असतो. परंतु पीएफ खात्याबद्दल एक समस्या अशी आहे की, समजा एकाहून अधिक ठिकाणी नोकरी बदलली तर एकापेक्षा जास्त पीएफ खाते होऊ शकतात.
नक्की वाचा:EPFO: सरकारकडून PF खातेधारकांना मोफत 7 लाख रुपये; असा घ्या लाभ...
यामुळे जुन्या कंपन्यांचा जो काही निधी आहे तो तुमच्या नवीन पीएफ खात्यात येऊ शकत नाही. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या पीएफ अकाउंट मर्ज अर्थात ते विलीन करून घेणे गरजेचे आहे.
कारण सरकार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून तुमच्या जमा रकमेवर व्याज लवकरच खातेदारांना ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. जर आपण या बाबतीतल्या आलेल्या बातम्यांचा विचार केला तर, या महिन्याच्या शेवटपर्यंत सरकार पीएफ अकाउंटमध्ये जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे पैसे टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे एकापेक्षा जास्त खाते असतील तर ते एकत्र करून घेणे खूप गरजेचे आहे.
या पद्धतीने करा तुमचे जुने खाते नवीन खात्यात विलीन
1- यासाठी तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या संकेतस्थळावर जाऊन कर्मचारी- वन ईपीएफ खात्यावर जावे. त्यानंतर खाते विलीन करण्याचा फॉर्म तुमच्यासमोर दिसेल व त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर आणि युएएन तसेच तुमचा आयडी टाकावा लागतो.
2- हे टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो व हा ओटीपी सबमिट करताच जुने पीएफ खाते तुम्हाला दिसते. त्यानंतर पीएफ खाते क्रमांक टाकावा.
3- यानंतर एक घोषणा पत्र येते ते स्वीकारावे व सादर करावे. काही दिवसानंतर तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाईल व व्हेरिफाय केल्यानंतर तुमचे पीएफ खाते विलीन केले जाईल.
Share your comments