कर्मचारी जेव्हा नोकरी करतात तेव्हा सरकारच्या विविध नियमांच्या खाली त्यांना मिळणारे लाभ मिळतात. कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या प्रत्येक लाभ हा सरकारच्या नियमांच्या चौकटीत राहून दिला जातो. यामध्ये वेगळ्या प्रकारचे फायदे असतात. असाच एक महत्त्वाचा कर्मचाऱ्यांना मिळणारा फायदा म्हणजे ग्रॅच्युईटी हा होय. याबाबत केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी आली असून केंद्र सरकार कामगार सुधारणासाठी चार नवीन लेबर कोड आणणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली आहे.
या सगळ्या लेबर कोडची केंद्र सरकार लवकरच अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्याच्या लेबर कोड मधील नियम बदलतील हे निश्चित आहे.
काय होऊ शकतात नियमात बदल?
जेव्हा नवीन कामगार संहिता अर्थात लेबर कोड लागू केला जाईल त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पीएफ, त्यांच्या रजा तसेच कर्मचाऱ्यांचे पगार आणि ग्रॅच्युईटी यामध्ये बदल होतील. एवढेच नाही तर कामाचा एकंदरीत कालावधी आणि कामाच्या बाबतीत असलेले एक आठवड्याचे नियम देखील बदलणे शक्य होणार आहे.
परंतु खास करून ग्रॅज्युटीच्या बाबतीत विचार केला तर जर एखादा कामगार एखाद्या संस्थेत पाच वर्षे काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटी दिली जाते, परंतु सरकारने जर नवीन लेबर कोड लागू करताच या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. परंतु अजून देखील सरकारने त्याबाबत घोषणा केलेली नाही.
नक्की वाचा:कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण! पेट्रोल 84 रुपयांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
ग्रॅज्युटीच्या बाबतीत सध्याचे नियम
जर आपण आताचे नियमांचा विचार केला तर कोणत्याही संस्थेमध्ये पाच वर्षे सेवा केल्यानंतरच ग्रॅज्युटीचा फायदा दिला जातो व ही ग्रेच्युटीची मोजणी महिन्यातील कर्मचाऱ्यांचे पगार किती आहेत या आधारे केली जाते.
आपण या संबंधीच्या आकडेवारी समजून घेतली तर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या संस्थेत किंवा कंपनीत दहा वर्ष सेवा दिली आणि शेवटच्या महिन्यात त्याच्या खात्यात दर पन्नास हजार रुपये आले व त्याचा मूळ पगार हा वीस हजार रुपये असेल तर याप्रमाणे सहा हजार रुपये महागाई भत्ता आहे.
अशा परिस्थितीत जर त्याच्या मिळणाऱ्या ग्रेच्युटीचा विचार केला तर ती एकूण 26 हजार रुपये पगार च्या आधारे मोजली जाईल. ग्रॅज्युटी मध्ये कामाचे एकूण दिवस एका महिन्यात 26 दिवस पकडले जातात.
परंतु आता लोकसभेत जो काही ड्राफ्ट दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष जरी सेवा दिली तरी त्याला ग्रॅज्युटीचा लाभ मिळेल. परंतु यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सुविधा फक्त कंत्राटावर काम करणाऱ्या साठीच केली आहे आणि ग्रॅच्युइटी कायदा 2020 चा फायदा हा फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल.
Share your comments