आपल्याकडे शेतमजुरी करणाऱ्याला दिवसाला किती रुपये मिळतात? जास्तीत जास्त 300 किंवा 400. काही भागात तर याहूनही कमी मजुरी दिली जाते. शेतमजुरी सोडा पण आपल्याकडे इंजिनीरिंग केलेल्याना देखील फक्त 15000 ते 20000 पर्यंत महिन्याला पेमेंट मिळते. पण युके (united kingdom) मधील एका फार्मिंग कंपनीने एका जाहिरातीत कोबी व ब्रॉकोली तोडणाऱ्याला 63 लाखांचं पॅकेज देण्यात येईल असे म्हटले आहे. वाचून कदाचित विश्वास बसणार नाही जेव्हा आम्हालाही ह्या विषयी समजलं तेव्हा विश्वास बसला नव्हता. पण हे 100 टक्के खरं आहे.
जर लाखोंचं पॅकेज भेटणार असेल तर आपण काही वेळेस जॉब प्रोफाइल देखील बघणार नाहीत. तेव्हा विचार करा जर कोबी व ब्रॉकोली तोडणाऱ्याला तब्बल 62,400 पाऊंड म्हणजे जवळपास 63 लाखांचं पॅकेज भेटलं तर कोणाला काय अडचण असेल ह्या कामाबद्दल. युनाइटेड किंगडम स्थित एक कंपनी कोबी, ब्रॉकोली तोडण्यासाठी एवढी मोठी रक्कम देणार आहे एवढेच नाही तर ओव्हरटाईम केला तर अजून पगारात वाढ देखील होऊ शकते आणि ह्यासोबतच अजून अनेक गोष्टी कंपनी देणार आहे. ज्यामुळे कोणीही ह्या कामासाठी आकर्षित होईल.
T H Clements and Son Ltd ह्या कंपनीला कोबी तोडण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे आणि त्यांनी ह्यासाठी ऑनलाईन जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत स्पष्टपने नमूद केले आहे की वर्षभरासाठी कोबी तोडायला त्यांना मजुराची आवश्यकता आहे आणि ह्या कामासाठी जवळपास 30 पाऊंड अर्थात 3000 रुपये तासाला मजुरी मिळणार आहे. याचाच अर्थ 62400 पाऊंड म्हणजे तब्बल 63 लाख वर्षाला पॅकेज भेटणार आहे. कंपनीने जॉब प्रोफाइल मध्ये नमूद केले आहे की, हे एक शारीरिक मेहनतीचे काम आहे आणि पूर्ण वर्ष हेच काम कराव लागेल.
फील्ड ऑपेरेटिव्हज म्हणून काम करणाऱ्याला मिळणार 3000 रुपये तास
ह्या कंपनीने दोन जाहिराती दिल्या होत्या ज्यापैकी एका जाहिरातीत म्हटले आहे की फील्ड ऑपेरेटिव्हस म्हणुन काम करणाऱ्याची कंपनीला आवश्यकता आहे हे काम पूर्णतः पिसवर्क आहे म्हणजे जेवढ्या ब्रॉकोली किंवा कोबी तोडल्या जातील तेवढे पैसे मिळतील. आणि ह्या नौकरीत जवळपास 3000 रुपये ताशी एक माणूस कमवू शकतो असा अंदाज कंपनीने बांधला आहे. आणि हे काम पूर्णवर्षभर चालणारे आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ह्या नौकरीत वेतन हे जेवढे ब्रॉकोली किंवा कोबी तोडली जाईल त्यावर अवलंबून असेल म्हणजे यापेक्षा अतिरिक्त देखील कमाई
ह्या कामातून होऊ शकते. जेवढे कोबी किंवा ब्रॉकॉली तोडले जाईल त्या हिशोबाने पैसे दिले जातील म्हणजे पेमेंट कामानुसार कमी जास्त होऊ शकते. परंतु शेतमजूरीसाठी एवढा चिक्कार पैसा भेटणार ही जाहिरातच आश्चर्यकारक आहे.
एवढा पगार देण्याचं काय आहे नेमक कारण
खरे पाहता युनाइटेड किंगडम मध्ये सध्या मनुष्यबळ खुप कमी उरले आहे, आणि म्हणुनच सरकार सीजनल एग्रीकल्चरल वर्कर्स स्कीम च्या माध्यमातून युके मध्ये सहा महिने कामासाठी आमंत्रित करीत आहे, जेणेकरून तिथे ही लोक काम करतील.
फक्त शेतीच नाही तर युकेमध्ये अन्य सेक्टर मध्ये देखील मॅनपॉवरची खुप कमतरता भासत आहे. त्यामुळे त्या कामासाठी देखील चांगले वेतनमान युकेमध्ये भेटत आहे.
T H Clements and Son Ltd ह्यांनी मंगळवारी आपल्या ऑफिसिअल फेसबुक हॅन्डल वर माहित देत लिहले की, त्यांनी जी जाहिरात दिली होती, त्यामुळे त्यांना खुप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यांना लागणाऱ्या माणसे आता ते निवडत आहेत.
Share your comments