भारतात सध्या लग्नाचे सीजन चालू आहे, आणि यावर्षी देखील मागच्या वर्षासारखे वऱ्हाडीची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. सरकारने यासाठी निर्बंध लावले आहेत. आज आपण लग्न, तसेच इतर लहान मोठे कार्यात उपयोगी पडणाऱ्या एका बिजनेस विषयी माहिती जाणुन घेणार आहोत. अनेक बेरोजगार युवक बिजनेस करण्याचे स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी आजचा हा लेख खुप विशेष ठरणार आहे.
आज आपण केटरिंग तसेच इव्हेंट मॅनॅजमेण्ट ह्या बिजनेसविषयी जाणुन घेणार आहोत. केटरिंग व इव्हेंट मॅनॅजमेण्ट हा व्यवसाय बारा महिने चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे यातून चांगली कमाई केली जाऊ शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया ह्या बारा महिने चालणाऱ्या बिजनेसविषयी सविस्तर.
कुठेहि सुरु करता येतो हा व्यवसाय
केटरिंग व इव्हेंट मॅनॅजमेण्ट हा व्यवसाय आपण आपल्या गावात किंवा शहरात कुठेही सुरु करू शकता. हा व्यवसाय आपण आपल्या घरातून सुरु करू शकता. हा व्यवसाय तस बघायला गेले तर बारा महिने चालतो, पण लग्नाच्या सीजनमध्ये हा व्यवसाय खुपच प्रॉफिट देणारा ठरतो आणि सध्या लग्नाचे सीजन चालू आहे म्हणुन ह्या व्यवसायातून चांगली मोठी कमाई होऊ शकते.
सुरवातीला लागेल भांडवल
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरवातीला भांडवल लागणार आहे. ह्या व्यवसायासाठी आपणांस भांडे, गॅस, मंडप, स्टेज, लाइटिंग, खुर्ची, फॅन, कुलर,इत्यादी वस्तू खरेदी कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला जवळपास दोन लाख रुपयार्यंत भांडवल लागू शकते. ह्या व्यवसायासाठी तुम्हाला लेबरची गरज भासेल यासाठी आपण आपण राहत असलेल्या ठिकानाहून लोकल लेबरला कामावर ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला आचारी देखील लागणार आहे, तसेच डेकोरेशन साठी एक कुशल वर्करची देखील आवश्यकता असेल. आपण डेकोरेशन स्वतः सुद्धा करू शकता, त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल.
किती होईल कमाई
केटरिंग आणि इव्हेंट मॅनॅजमेण्ट हा व्यवसाय एक हाय प्रॉफिट मिळवून देणारा बिजनेस आहे. जर तुम्हाला एक लग्नाचे केटरिंग आणि इव्हेंटचे काम मिळाले तर तुम्ही यातून जवळपास वीस हजार रुपये कमवू शकता. हा आकडा कमी जास्त होऊ शकतो. जर आपण महिन्याला 5 जरी कार्यक्रम हाती घेतले तरी आपणांस 1 लाख रुपये महिन्याला प्रॉफिट मिळू शकतो. तसेच हा व्यवसाय फक्त लग्न सीजनमधेच नाही तर बारा महिने चालतो. आणि आता अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी लोक केटरिंग आणि इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या लोकांना टेंडर देऊ करतात, त्यामुळे ह्या व्यवसायाला चांगला मोठा स्कोप आहे.
Share your comments