1. इतर बातम्या

Important: भावांनो! कोणाला कर्जासाठी जामीनदार होत असाल तर अगोदर 'हे' नक्की वाचा

जेव्हा आपण बँकेमध्ये असो की एखाद्या खाजगी वित्तीय संस्थांमध्ये कर्ज घेण्यासाठी जातो व जेव्हा कर्ज मंजूर केले जाते त्यावेळी बर्याच प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता ओळखीतले एक किंवा दोन जामीनदार आवश्यक असतात. आता आपण पाहतो की, माणूस सहजासहजी पटकन कुणाला बँकेमध्ये असो किंवा एखाद्या खासगी वित्तीय संस्था यामध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जामीनदार होण्यासाठी तयार होतो. परंतु आपल्याला याबद्दल असलेले नियम देखील माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे.त्यामुळे या लेखात आपण अल्पशी माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
precaution of bank loan guarantor

precaution of bank loan guarantor

जेव्हा आपण बँकेमध्ये असो की एखाद्या खाजगी वित्तीय संस्थांमध्ये कर्ज घेण्यासाठी जातो व जेव्हा कर्ज मंजूर केले जाते त्यावेळी बर्‍याच प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता ओळखीतले एक किंवा दोन जामीनदार आवश्यक असतात.

आता आपण पाहतो की, माणूस सहजासहजी पटकन कुणाला बँकेमध्ये असो किंवा एखाद्या खासगी वित्तीय संस्था यामध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता जामीनदार होण्यासाठी तयार होतो. परंतु आपल्याला याबद्दल असलेले नियम देखील माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे.त्यामुळे या लेखात आपण अल्पशी माहिती घेऊ.

नक्की वाचा:कौतुकास्पद कामगिरी! 'या' जिल्ह्यातील 1.50 लाख शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष भरले कृषी कर्जाचे नियमित हप्ते, वाचा सविस्तर

 अगोदर जामीनदार म्हणजे काय ते पाहू

 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो कर्ज घेतो त्या व्यक्तीवर तर कर्जाचा बोजा किंवा कर्ज फेडण्याची जबाबदारी असते. परंतु कर्जाचा जामीनदार म्हणजे ज्याच्या वर देखील ही जबाबदारी असते की जर कर्जदाराने संबंधित घेतलेले कर्ज फेडले नाहीतर कर्जाचा जामीनदार  कर्जाची परतफेड करेल.

तसेच जामीनदार होण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारच्या अनेक अटी व शर्तीचे डॉक्युमेंटवर सही देखील करावी लागते. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला जामीनदार होण्याचे नियम आणि काय अर्थ होता ते सगळे माहित आहे. त्यामुळे कोणालाही जामीनदार होताना दहा वेळेस मागचा पुढचा विचार करून होणे हिताचे ठरेल.

नक्की वाचा:PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे

 असते कायदेशीर कारवाईची देखील शक्यता

 आपल्याला  समजलं असेल कि बँकेच्या नियमानुसार कर्जाचा जामीनदार हासुद्धा कर्जदार असतो.  ज्या व्यक्तीला जामीनदार झाला आहात आणि त्या व्यक्ती कर्ज भरू शकले नाही म्हणजेच डिफॉल्टर झाले तर जामीनदारावर देखील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बँकेच्या किंवा तत्सम वित्तीय संस्थांचे नोटिसा जशा कर्जदाराला येतात तसेच जामीनदारला देखील पाठवल्या जाऊ शकता.

 यासाठी सोपा सुरक्षित मार्ग

 जर तुम्ही कोणाला कर्जासाठी जामीनदार होत असेल तर त्याला आपल्या कर्जाचा विमा काढण्यास सांगणे फार गरजेचे आहे.

जर एखाद्या कारणामुळे कर्जदाराचा मृत्यू झाला किंवा एखादी नको ती घटना घडली तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीच्या असेल. म्हणजे तुम्हाला जो काही मनस्ताप होण्याची शक्यता असते त्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.

 बँक जामीनदार केव्हा मागते?

 जेव्हा बँकेला संबंधित देत असलेल्या कर्जाची परतफेड बाबत शंका असते किंवा पुरेशी गॅरंटी नसते तेव्हा ते जामीनदार आणायला सांगतात. तसेच घेतलेल्या कर्जाची रक्कम जर मोठी असेल तर तेव्हा जामीनदार हा लागतोच.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे

English Summary: can you be guarantor to any person for his bank loan so take precaution Published on: 28 August 2022, 06:00 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters