1. इतर बातम्या

Gold-Silver Market: एका वर्षात चांदीचे भाव 85 हजार पर्यंत जाण्याची शक्यता, सोन्या चांदीचे गुणोत्तर 83च्यावर

सध्या सोने व चांदी या दोघांच्या भावाची तुलना केली तर सोन्याचे भाव चांदीच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. यांचे प्रमाण सध्या 83 च्या वर आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
can growth in wiil be coming days in silver by 85000 per kilogram

can growth in wiil be coming days in silver by 85000 per kilogram

 सध्या सोने व चांदी या दोघांच्या भावाची तुलना केली तर सोन्याचे भाव चांदीच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. यांचे प्रमाण सध्या 83 च्या वर आहे.

जर हीच  परिस्थिती राहिली तर चांदीच्या दरात एका वर्षात 85 हजार रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. शुक्रवारी आयबीजेएवर चांदीची  किंमत 62 हजार 788 रुपये प्रति किलो होती. सोने आणि चांदीचे गुणोत्तर म्हणजे एक औंस सोन्याने किती चांदी खरेदी केली जाऊ शकते यावरून ठरते.

या दोघांमधील उच्च गुणोत्तर म्हणजे सोन्याची किंमत जास्त आहे तर कमी गुणोत्तर म्हणजे चांदी महाग आहे, असा होतो. सध्याचे हे प्रमाण पाहिले तर सोने आणि चांदीचे प्रमाण 62 च्या आसपास आहे, जे सध्या 83च्या वर आहे.

याविषयी तज्ञ आणि केडिया ऍडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, 12 मे रोजी सोन्या-चांदीचे गुणोत्तर यावर्षीच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 89 वर होते. जे आत्ता 83.64 वर आले आहे. याचा अर्थ चांदीचा भाव सध्या वाढत असून हाच कल कायम राहिला तर एका वर्षात चांदी  85 हजार रुपये प्रति किलो जाऊ शकते.

नक्की वाचा:Gold Price: सोन खरेदी करायचय का? मग, लवकरच खरेदी करा सोन्याच्या दरात झाली एवढी घसरण

 चांदीच्या भावांमधील वाढ होण्याची कारणे

 सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे लोक गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांदी कडे वळत आहेत. स्टरलींग सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीची जागतिक मागणी या वर्षी विक्रमी 34 हजार 750 टनांवर जाण्याची शक्यता आहे.

तसेच या वर्षी दागिन्यांची मागणी ही 11 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे, तर चांदीच्या वस्तूंच्या मागणीत 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासोबतच फोटोव्होल्टेइक वापर, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मागणी 12% वाढण्याचा  अंदाज आहे.

परंतु चांदीचे खाणकाम गेल्या एक दशकापासून स्थिर आहे.तज्ञांच्या मते भारतात चांदीचा भविष्यकाळ चांगला असून चांदीच्या दागिन्यांची मागणी देखील गेल्या काही वर्षांत 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. चांदीच्या किमतीतील वाढ देखील यापुढे कायम राहणार आहे.

नक्की वाचा:Gold Price Today: सोन्याच्या दरात 5 हजाराची घसरण, 29,954 रुपये प्रति 10 ग्रामचा भाव

नक्की वाचा:ओरिगो - मंडी: कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता, एक ते दोन महिन्यात कमालीचे घसरू शकतात भाव

English Summary: can growth in wiil be coming days in silver by 85000 per kilogram Published on: 05 June 2022, 06:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters