फिटमेंट फॅक्टर वाढवण्यास लवकरच सरकार मान्यता देऊ शकते.केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 2.57 पटीवरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केली आहे. जर असे झाले तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल.
केंद्र सरकारने या अगोदर 2017 यावर्षीएन्ट्री लेवल बेसिक वेतन सात हजार रुपये प्रतिमहिना वरून अठरा हजार रुपये केले होते.
फिटमेंट फॅक्टर वाढेल
जर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात वाढ होईल. सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57टक्के पगार मिळतो,
तो जर सरकारने 3.68टक्के केला तर कर्मचाऱ्यांचे कमीत कमी वेतन आठ हजार रुपयांनी वाढ होऊ शकते.याचा अर्थ असा होतो की, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे कमीत कमी वेतनअठरा हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांत वाढणार आहे.सध्या केंद्रीय कर्मचारी यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये आहे.
नक्की वाचा:7th pay commission: कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 2 लाख रुपये दिले जाणार?
पगारात होऊ शकते भरगच्च वाढ
जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 18000 रुपये असेल तर भत्ते वगळून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टर नुसार 46 हजार 260 रुपये( 18000×2.57=46,260) रुपये मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95 हजार 680 रुपये असेल.
पूर्वी होता हा मूळ पगार
जून 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मंजूर केल्या होत्या. यामध्ये प्रवेश स्तरावरील मूळ वेतन दरमहा सात हजार रुपये वरून 18 हजार रुपये करण्यात आले होते
तर सर्वोच्च स्तरातील म्हणजेच सचिवाचे वेतन 90 हजार रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात आले होते. वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांसाठी सुरुवातीचे वेतन 56 हजार शंभर रुपये होते.
Share your comments