1. इतर बातम्या

Bussiness Opportunity In Food Sector : अन्न व खाद्य क्षेत्रातील उद्योग संधी देईल बेरोजगारांना आर्थिक पाठबळ

जर भारतातील बेरोजगारीचा विचार केला तर बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे दरवर्षी महाविद्यालयांमधून असंख्य प्रमाणात बेरोजगारांचे लोंढे बाहेर पडत आहेत. परंतु त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात नैराश्य येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
backrey shop

backrey shop

जर भारतातील बेरोजगारीचा विचार केला तर बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे दरवर्षी महाविद्यालयांमधून असंख्य प्रमाणात  बेरोजगारांचे लोंढे बाहेर पडत आहेत. परंतु त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात नैराश्य येते.

जर नोकरी मागे न लागता  एखादा उद्योग, व्यवसाय करायचे ठरवले तर ते अधिक फायदेशीर ठरू शकते. अनेक उद्योग व्यवसायासाठी शासनाकडून देखील कर्जरूपाने मदत केली जाते.परंतु व्यवसायाचा विचार करत असतांना तो कोणता करावा याबद्दल बऱ्याच जणांच्या मनाची द्विधा परिस्थिती होते या लेखामध्ये आपण अन्न व खाद्य सतरा मध्ये असलेल्या विविध प्रकारच्या छोट्या उद्योग संधी बद्दल जाणून घेऊ.

 अन्न व खाद्य उद्योग क्षेत्रातील विविध प्रकारच्या संधी….

  • फास्टफुड शॉप- सध्याचा काळ हा धावपळीचा असल्यामुळे प्रत्येकालावेळेचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा पटापट बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे फास्ट फूड शॉप हे सर्वात जास्त लोकप्रिय होत आहेत. आज कालच्या तरुणांचा विचार केला तर प्रामुख्याने नाश्त्यामध्ये फास्टफूड ला पसंती दिली जाते. या क्षेत्रात जर व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये फ्रॅंचाईजी देखील उपलब्ध आहेत.
  • किराणा मालाचे दुकान(Grocerry Shop)- किराणा दुकान हासुद्धा एक खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अगदी कमी जागेत सुद्धा सुरू करता येतो. परंतु हा व्यवसाय कसा सुरु करायचा असेल तर त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसराचे सर्वेक्षण करून तेथील असलेल्या लोकांची गरज व अगोदर असलेले इतर दुकाने यांचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते. त्यानुसार तुम्हाला तुमच्या दुकानाची रचना करावी लागेल व त्यानुसार असतो मला तुमच्या दुकानाचीब्रँडिंग करणे सोपे जाईल.
  • बेकरी- बेकरी हा व्यवसाय तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून सुरु करता येऊ शकतो. अगदी मोठ्या व छोट्या पातळीवरदेखील हा व्यवसाय सुरू करता येतो. व्यवसायामध्ये तुम्ही बिस्कीट आणि ब्रेड या पासून सुरु करू शकतात. त्यासाठी तुम्हाला ब्रेड आणि बिस्कीटचा वेगवेगळ्या पाककृती तयार करता आल्या पाहिजेत.

4-चॉकलेट बनवणे(Making Chocklet)-बऱ्याच व्यक्तींना चॉकलेट बनवण्याची खूप आवड असते.अशा व्यक्तींसाठी हा व्यवसाय फारच फायदेशीर आणि अनुकूल आहे अगदी कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय घरातुन सुरु करू शकतात.

  • कुकिंग क्लासेस(Cooking Classes)- यामध्ये महिला सहजपणे चांगल्या प्रकारचा जम बसू शकतात. कुकिंग क्लासेस चा व्यवसाय अगदी तुम्ही घरातून सुरू करू शकतात. जर यामधील गुंतवणुकीचा विचार केला तर अगदी अल्प गुंतवणूक यामध्ये लागते परंतु यामधून नफा फार जास्त मिळतो.
  • आईसक्रीमचे दुकान-(IcecreameShop)- आईस क्रीम चे दुकान वर्षभर चालू शकते.या व्यवसायाची सुरुवात अगदी कमी भांडवलामध्ये करता येते. तसेच या उद्योगांमध्ये विविध कंपन्यांच्या फ्रॅंचाईजी उपलब्ध असून त्यामुळे मार्केटिंग चे कष्ट वाचू शकतात.
  • डेअरी व्यवसाय(Dairy Bussiness)-हाय एक आईस्क्रीम उद्योगा सारखाच उद्योग असून यामध्ये मोठ्या उद्योगांची फ्रॅंचायजी घेणे शक्य आहे.स्वतःचे दुग्ध पदार्थ तयार करून ते तुम्ही विकू शकतात.
  • चायनीज फूड स्टॉल(Chinease Food Stall)- सध्या तरुणाईमध्ये चायनीज फूडची फार क्रेझआहे. एखादे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संकुल जवळ ठिकाणी हा व्यवसाय जास्त यश देऊ शकतो.परंतु पुरेसा बाजाराचा अभ्यास करूनच या व्यवसायात उतरणे फायदेशीर ठरते.
  • ऑरगॅनिक दुकान(Organic Shop)- सध्या लोकांमध्ये आरोग्याबद्दल फारच प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या शहरी भागात लोक आरोग्याबद्दल जास्त सतर्क आहेत.
  • अशा भागामध्ये ऑरगॅनिक पदार्थांना जास्त महत्त्व मिळू लागले आहे. अशा शहरी भागांमध्ये ऑरगॅनिक पदार्थांचे दुकान स्थापन करून  चांगला नफा मिळू शकतो.
  • पापड उद्योग(Papad Making Bussiness)-जेवताना सोबत पापड हे अगदी जवळ-जवळ सर्वांचे आवडते खाणे आहे. पापड बनवणे अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी भांडवलात सुरु करता येऊ शकते. या व्यवसायाची अगदी करून सोप्या पद्धतीने सुरुवात करता येते.
  • बिस्किट आणि कुकीज बनवणे- घरातून सुरू केला जाऊ शकणारे व्यवसाय पैकी हा व्यवसाय आहे. यामध्ये तुम्ही स्वतःच्या बिस्कीट बनणारे एक स्वयंचलित युनिट सुद्धा उभी करू शकतात.
English Summary: bussiness oppurtunity in food sector can give fanancial stability to youngster Published on: 25 February 2022, 12:25 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters