नवी मुंबई: जर तुम्ही नोकरीला कंटाळले असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो तुम्ही पाहिले असेलच की उन्हाळ्याच्या दिवसात डासांचा खूप त्रास होऊ लागतो.
यामुळे तुम्ही मच्छरदाणी बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगली बक्कळ कमाई करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात या व्यवसायाला मोठी मागणी असते. निश्चितच तुम्हाला जर व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण हा व्यवसाय सुरू करून चांगला फायदा घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया याबद्दल सविस्तर.
या बिझनेस आयडियाबद्दल जाणून घ्या
मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की, उन्हाळ्याच्या दिवसात डास खूप त्रास देतात. यासोबतच पावसाळ्यात डास चावल्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांशीही लढावे लागते.
अशा परिस्थितीत बहुतेकांना मच्छरदाणी लावून झोपायचे असते. म्हणुन आपण हा व्यवसाय सुरू करून भरपूर कमाई करू शकता.
या पद्धतीने व्यवसाय सुरू करा
जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला यासाठी खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता, तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मच्छरदाणीची ट्रेडिंग करावी लागेल.
तुम्ही कमी किमतीत मच्छरदाणी विकत घेऊ शकता आणि जास्त किमतीत विकू शकता. तुम्ही मच्छरदाणी सुमारे 100 रुपयांना खरेदी करू शकता आणि किमान 200 ते 300 रुपयांना बाजारात विकू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही छोटी जागा भाड्याने घेऊ शकता. तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 हजार रुपये खर्च करावे लागतील.
Share your comments