Business Idea: जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. सध्या देशातील नवयुवक नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्यात अधिक रुची दाखवत आहेत. नोकरीतन मिळत असलेले मानधन समाधानकारक नसल्याने अनेक जण नोकरी बरोबरच अंशकालीन व्यवसाय करण्याच्या तयारीत देखील आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवयुवकांसाठी तसेच महिलांसाठी एक व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आज आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू केला जाऊ शकतो. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय तुम्ही राहत असलेल्या घरात देखील सुरू केला जाऊ शकतो. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पापड मेकिंग बिजनेसचा.
पापड मेकिंग बिजनेस हा असा व्यवसाय आहे ज्यात गुंतवणूक खूपच कमी असते. या व्यवसायाची आपण एक 35 हजाराची मशीन घेऊन पायाभरणी करू शकता आणि पहिल्याच महिन्यापासून चांगली तगडी कमाई करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पापड मेकिंग बिजनेस विषयी काही महत्त्वाच्या बाबी.
मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पापड मेकिंग मशीन आवश्यक असणार आहे. मित्रांनो पापड मेकिंग मशीन दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. मात्र तुम्ही सुरुवातीला एक छोटी मशीन जी की फक्त 35 हजार रुपयाला आहे ती घेऊन देखील या व्यवसायाचे पायाभरणी करू शकता. मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, दोन लाखाची मशीन तसेच 35 हजाराची मशीन दोन्ही मशीन मध्ये तंत्रज्ञान सारखेच आहे.
मात्र दोन्ही मशीनच्या उत्पादनक्षमतेत मोठा अंतर आहे. यामुळे सुरुवातीला आपण लहान मशीन घेऊन या व्यवसायाची सुरुवात करू शकता. छोटी मशीन चा वापर करून आपण दोन तासात 200 पापड बनवू शकतात तर मोठी दोन लाखांच्या मशिनचा वापर करून आपण दोन तासात तब्बल एक हजार पापड बनवू शकता. या मशिनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या मशीनमध्ये पीठ बनवण्यापासून ते पापड लाटण्यापर्यंत सर्व कामे ऑटोमॅटिक पद्धतीने केली जातात.
या मशिनच्या माध्यमातून एक हजार पापड बनवण्यासाठी एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जर आपण एका पापड मागे एक रुपयाचे मार्जिन ठेवले तर तुम्हाला दिवसाकाठी एक हजार रुपयांची सहज कमाई होऊ शकते.
निश्चितच 36 हजारांची मशीन खरेदी करून आपण महिन्याला 30 हजारांची कमाई सहजरीत्या करू शकणार आहात. शिवायं आपला सेल वाढला की नफा देखील वाढणार आहे. यामुळे हा एक कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय सिद्ध होणार आहे.
Share your comments