1. इतर बातम्या

Business Idea: नोकरीची चिंता सोडा; सुरु करा 'हा' व्यवसाय, आणि कमवा लाखों रुपये

भारतातील मोठ्या संख्येने नोकरदार लोक त्यांच्या नोकरीवर खूश नाहीत. तुम्‍ही तुमच्‍या नोकरीवर खूश नसल्‍यास आणि ती सोडून एखादा खास बिझनेस सुरू करण्‍याचा विचार करत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला बिझनेसची एक आयडिया देणार आहोत.

Business Idea

Business Idea

भारतातील मोठ्या संख्येने नोकरदार लोक त्यांच्या नोकरीवर खूश नाहीत. तुम्‍ही तुमच्‍या नोकरीवर खूश नसल्‍यास आणि ती सोडून एखादा खास बिझनेस सुरू करण्‍याचा विचार करत असाल तर आज आम्‍ही तुम्‍हाला बिझनेसची एक आयडिया देणार आहोत. जर तुम्ही हा व्यवसाय नियोजित आणि नियमितपणे सुरू केलात तर तुमचा व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. या व्यवसायातून तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता.

यामध्ये मखनाची लागवड करून बाजारात विक्री करावी लागते. बाजारात माखणाला खूप मागणी आहे. प्रत्येक ऋतूमध्ये याचे सेवन केले जाते. शहरात, खेडेगावात सर्वत्र खाल्ले जाते. बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये माखनाची सर्वाधिक लागवड केली जाते. तुम्ही बिहारमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सरकारकडून अनुदानही मिळेल.

1 हेक्‍टर जमिनीवर माखणा लागवड केल्यास सरासरी 97 हजार रुपये खर्च येतो. दुसरीकडे, जर तुम्ही बिहारचे रहिवासी असाल, तर तुम्हाला ही शेती सुरू करण्यासाठी सरकारकडून सबसिडी देखील मिळेल. तुम्हाला माखणा लागवडीसाठी बियाणे खरेदी करण्याची देखील चिंता करावी लागणार नाही. मागील पिकाचे बियाणे तुम्ही सहज मिळवू शकता.

3 ते 4 लाख रुपये नफा मिळणार

या शेतीत तुमचा बहुतांश पैसा मजुरीवर खर्च होईल. या पिकाची लागवड करताना, तुम्हाला मेहनत आणि काळजी दोन्ही घ्यावी लागेल. केवळ या पिकाची लागवड करणे हे खूपच कष्टाचे काम आहे. यामध्ये तुम्हाला मजुरांची मदत घ्यावी लागेल. पीक तयार झाल्यावर ते बाजारात विकून चांगला नफा मिळवता येतो. माखणा व्यतिरिक्त त्याच्या देठांना आणि कंदालाही स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ते विकूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. माखणाच्या लागवडीतून तुम्ही एका वर्षात 3 ते 4 लाख रुपये सहज कमवू शकता.

English Summary: Business Idea: job worry soda; Start 'ha' business, and earn lakhs of rupees Published on: 30 January 2022, 03:52 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters