1. इतर बातम्या

Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरी सोडा…! 35 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय, 5 लाखांपर्यंत होणार कमाई

Business Idea: पारंपरिक शेतीत (Farming) नफा सातत्याने कमी होत आहे. घर चालवण्यासाठी शेतकरी बांधव (Farmer) आता वेगवेगळ्या शेती पूरक व्यवसायात (Agri Business) आपला हात आजमावत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आत्ता मधमाशीपालन (Bee Keeping) हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
business idea

business idea

Business Idea: पारंपरिक शेतीत (Farming) नफा सातत्याने कमी होत आहे. घर चालवण्यासाठी शेतकरी बांधव (Farmer) आता वेगवेगळ्या शेती पूरक व्यवसायात (Agri Business) आपला हात आजमावत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आत्ता मधमाशीपालन (Bee Keeping) हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत.

खरं पाहता इतर शेतीपूरक व्यवसायाच्या तुलनेत मधमाशी पालन हा व्यवसाय सर्वोत्तम मानला जातो. हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत (Low Investment Business) आणि कमी जागेत सुरू करता येत असल्याने शेतकरी बांधव या व्यवसायास अधिक पसंती दर्शवीत आहेत. विशेष म्हणजे मधमाशी पालन व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून शासन दरबारी अनेक योजना देखील राबवल्या जात आहेत.

या व्यवसायात कमी खर्च आणि जास्त नफा शेतकरी बांधवांना मिळत असल्याने  या व्यवसायाकडे आता मोठ्या आशेने बघितले जात आहे. निश्चितच मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मधमाशीपालन या व्यवसायाविषयी काही महत्त्वाच्या बाबी येऊन हजर चालू आहोत.

35 ते 40 हजार खर्च अन लाखोंचा नफा

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, तसेच या व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, 10 खोक्यांपासून मधमाशी पालन सुरू करण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो.

एवढेच नाही 10 खोक्या पासून सुरू केलेल्या या व्यवसायात मधमाशांची संख्याही दरवर्षी वाढते. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मधमाश्या जितक्या जास्त वाढतील तितका जास्त मध तयार होईल आणि नफा देखील लाखो पटींनी वाढेल.

मधमाश्या ठेवण्यासाठी मेणाचे डबे लागतात

शेतकऱ्यांना मधमाश्या ठेवण्यासाठी सेंद्रिय मेणाची व्यवस्था करावी लागते. या पेटीत 50 ते 60 हजार मधमाश्या एकत्र ठेवल्या जातात. या मधमाशांकडून सुमारे एक क्विंटल मध तयार होते.

85 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे

नॅशनल बी बोर्ड (NBB) ने मधमाशी पालनादरम्यान शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत देण्यासाठी नाबार्डशी करार केला आहे. दोघांनी मिळून भारतात मधमाशीपालन व्यवसायासाठी वित्तपुरवठा योजना सुरू केली आहे. याचा या क्षेत्रात रस असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.  याशिवाय केंद्र सरकार मधमाशी पालनावर 80 ते 85 टक्के अनुदान देते.

1000 किलो मधावर 5 लाखांपर्यंत नफा

सध्या बाजारात मधाची किंमत 400 ते 700 रुपये प्रति किलो आहे. जर तुम्ही प्रति बॉक्स 1000 किलो मध तयार केले तर तुम्हाला दर महिना 5 लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकेल.

English Summary: business idea bee keeping business information Published on: 19 July 2022, 08:14 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters