Business idea 2022: भारतात अलीकडे तरुण वर्ग व्यवसायाकडे वळू लागला आहे. आपल्या देशात खरं पाहता व्यवसाय करण्याच्या आणि त्यातून चांगले पैसे कमावण्याच्या अनेक शक्यता आता निर्माण झाल्या आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गरज आहे ती आपले बजेट, कामातील स्वारस्य आणि विशिष्ट ठिकाणी व्यवसाय चालवण्याची शक्यता तपासणे. एवढे केल्यानंतर आपण व्यवसाय सूरु करू शकता. अशा परिस्थितीत आज आपण एक भन्नाट व्यवसायाची कल्पना जाणून घेणार आहोत.
आज आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जेनेरिक औषध वितरण स्टार्टअप 'जेनेरिक आधार' कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही लाखो कमवू शकता. आजच्या युगात बंपर कमाईसाठी वैद्यकीय क्षेत्र हा एक मोठा पर्याय आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या स्टार्ट अप सोबत काम करून चांगली बक्कळ कमाई करू शकता.
जेनेरिक आधार स्टार्टअप म्हणजे काय
जेनेरिक आधार कंपनी ग्राहकांना औषधांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देते. दुकानदारांना औषधांवर 20 ते 40 टक्के मार्जिनही मिळते. तुमच्यासाठी नवीन मेडिकल स्टोअर्स उघडण्यापासून, ही कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना औषधांच्या वितरणात पूर्णपणे मदत करते. हे स्टार्टअप मोठ्या कंपन्यांच्या औषधांवर 15-20 टक्के सूट देते.
जर तुम्ही मेडिकल स्टोअर ऑपरेटर असाल, तर तुमच्यासाठी जेनेरिक आधार स्टार्टअप सोबत काम करणे खूप फायदेशीर ठरेल. जेनेरिक औषधांची मागणी आणि त्यात मिळणारे मार्जिन तुम्हाला नक्कीच लाखोंची कमाई करवून देणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही जेनेरिक आधार कंपनीचे उत्पादन ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे विकू शकता.
टाटा समूहाने गुंतवणूक केली आहे
टाटा समूहाने जेनेरिक आधार स्टार्टअप्समध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. स्वत: रतन टाटा यांनी या कंपनीत खूप रस दाखवला आहे. कंपनीची दुकाने देशभर सुरू होत आहेत. टाटा व्यतिरिक्त काही मोठ्या कंपन्यांनीही या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
फ्रँचायझी घेण्याची प्रक्रिया काय आहे
तुम्ही जेनेरिक औषधे विकून पैसे कमवायचे ठरवले असेल, तर जेनेरिक आधार फ्रँचायझी घेणे हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही कंपनीच्या www.gemericaadhar.com वेबसाइटवर जा आणि व्यवसाय संधी विभागाला भेट द्या. येथे तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरावे लागतील, त्यानंतर जेनेरिक आधार कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल. सर्व माहिती घेतल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
Share your comments