1. इतर बातम्या

आनंदाची बातमी! 'या' ठिकाणी बुलेट भेटतेय मात्र 72 हजार रुपयात; जाणुन घ्या क्लासिक 350 वर मिळत असलेली भन्नाट ऑफर

देशात सर्वत्र बाईक्सच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, देशात रॉयल एनफिल्ड कंपनीची बाईक मोठी लोकप्रिय आहे. परंतु या बाईकची किंमत सर्वसामान्यांसाठी परवडणारी नाही त्यामुळे मध्यमवर्गीय लोक आशा असून देखील या बाईकची खरेदी करू शकत नाही. देशात सध्या 125cc बाईक ची किंमत जवळपास एक लाख रुपयांहुन अधिक आहे, रॉयल एनफिल्डच्या बुलेटची किंमत तर आकाशाला गवसणी घालत आहे. रॉयल एनफिल्ड नवयुवकांची पहिली पसंत असते मात्र त्याची किंमत अधिक असल्याने नवयुवकांना आपल्या पसंतीची बाईक घेता येत नाही. अनेक लोक रॉयल एनफिल्ड बाईक डाऊन पेमेंट भरून मासिक हफ्त्याने घेत असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ROYAL ENFIELD

मात्र याची इएमआय देखील जास्त असल्याने देशातील अनेक रॉयल इन्फिल्ड प्रेमी या बाईक पासून वंचित राहतात. ज्या लोकांना रॉयल एनफिल्ड बाईक नव्याने खरेदी करता येत नाही ते लोक रॉयल एनफिल्ड बाईक सेकंड हॅन्ड अर्थात जुनी खरेदी करत असतात. मात्र असे असले तरी अनेक लोकांना सेकंड हॅन्ड रॉयल एनफिल्ड गाडी चांगली कंडिशन मध्ये तसेच चांगल्या किमतीत उपलब्ध होत नाही. रॉयल एनफिल्ड बाईक जुनी खरेदी करताना अनेक लोकांना गंडा लावला जातो त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांची मोठी फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आता देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लोकांना कमी किमतीत आणि चांगल्या कंडीशन मध्ये सेकंड हँड बाईक्स प्रोव्हाइड करत असतात, कंपनी या सेकंड हॅन्ड बाईक्सवर वारंटी देत असते त्यामुळे लोकांना याचा फायदा होतो तसेच लोकांची फसवणूक टळते. या अशा कंपन्या सेकंड हॅन्ड बाईकला देखील नव्या बाईक सारखी सुविधा देत असल्याने लोकांना नवीन गाडी खरेदी करण्यासारखाच अनुभव जुनी गाडी खरेदी करताना होतो.

सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री करणारी साईट Bikes24 या कंपनीने आपला साइटवर रॉयल एनफिल्ड गाडी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने 2015 वर्षाची रॉयल एनफील्ड क्लासिक 350 विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. ही गाडी फर्स्ट ओनरशिपची आहे. ही गाडी खूपच टिप-टॉप कंडिशन मध्ये आहे. या गाडीला कुठल्याच प्रकारचे स्क्रेच नाहीत, मात्र या गाडीचा इन्शुरन्स संपला आहे.

या गाडीची दिल्ली आरटीओ मध्ये नोंदणी आहे. ही गाडी आपणास जर खरेदी करायची असेल तर गाडीचे मूळ आरसी मिळेल. बाईक परिपूर्ण चांगल्या स्थितीत आहे आणि चाचणी अहवालानुसार या गाडीचे सर्व भाग कार्यरत स्थितीत आहेत.  या बाईकची किंमत 72 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.  मित्रांनो ही बाईक आपणांस सिल्व्हर कलरमध्ये मिळेल. ही बाइक एकूण 13,095 किमी धावली आहे. मित्रांनो जर आपणास ही गाडी विकत घ्यायची असेल तर आपणास Bikes24 या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

English Summary: bullet is only at 72000 Published on: 23 February 2022, 01:27 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters