1. इतर बातम्या

ब्रेकिंग : भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गाडी खोल नदीत...

Nagpur Winter Session : नागपुरातील अधिवेशन आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
BJP MLA Jayakumar Gore

BJP MLA Jayakumar Gore

Nagpur Winter Session : नागपुरातील अधिवेशन आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

साताऱ्यातील माण खटाव भाजपचे आमदार आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गोरे यांच्यासह त्याचे सहकारी जखमी झाले आहेत. त्यांच्या चालक आणि अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे गोरे यांची कार अंदाजे 30 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे.

जयकुमार गोरे साताऱ्यातील माण खटावमधील आमदार आहेत. ते आपल्या मतदार संघात जात असताना काळोखामुळे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 80 कोटी लोकांना पुढील एक वर्ष मोफत रेशन मिळणार

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते पुण्याकडे धाव घेऊ लागले आहेत.

गाडीत असणारे त्यांचे पीए रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामती इथं तर बॉडीगार्ड जनार्दन बनसोडे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघाताचं वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिलीय.

English Summary: Breaking: BJP MLA Jayakumar Gore's car met with a terrible accident Published on: 24 December 2022, 10:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters