३१ मे पर्यंत दुकाने, आस्थापना आणि कार्यालयांवर मराठीत नावाच्या पाट्या लावण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिल्या आहेत, अन्यथा कारवाई केली जाईल. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ च्या कलम ३६ 'क' (१) अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक दुकान-आस्थापनांना लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. दुकानदारांनी मराठी फलक लावले की नाही?
याबाबत पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान त्याने मराठी फलक लावण्यास नकार दिल्यास थेट न्यायालयात खटला दाखल केला जाईल. कोर्टात जायचे नसेल तर दंड भरावा लागेल. मुंबई महापालिकेने ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.
दहापेक्षा कमी कामगार असलेली आस्थापना आणि दुकाने नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या यासंदर्भात राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात बैठक घेऊन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अधिवेशनात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यात सुधारणा करण्यात आली.
बहुतांश दुकाने आणि व्यापाऱ्यांकडे दहापेक्षा कमी कामगार असल्याचे लक्षात घेता, यापुढे रस्त्यालगतच्या सर्व दुकानांवरील फलक मराठीतच असावे लागणार आहेत. मराठीतील देवनागरी लिपीतील अक्षरे इतर इंग्रजी किंवा इतर लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
जमिनीविषयी शासन निर्णय! आता जिरायती जमीन कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन 10 गुंठे करता येणार खरेदी
Share your comments