भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधार कार्डचा उपयोग जवळपास सर्वच सरकारी व गैर सरकारी कामात केला जातो. आधार कार्ड बिना भारतात एक सिम देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. आधार कार्ड हे बँकिंग कामात एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून उपयोगात आणले जाते. बँकेत खाते खोलण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, शाळा महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी, अशा नाना प्रकारच्या कामात आधार कार्डची गरज भासत असते.
त्यामुळे आपले आधार कार्ड अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य असते तसेच आधार सोबत पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड इत्यादी महत्त्वाचे दस्तऐवज लिंक असणे देखील अलीकडे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व त्यासंदर्भात फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले गेले आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे असते. आज आपण ब्लु आधार कार्ड का बनविले जाते व हे कोणत्या व्यक्तीसाठी बनविले जाते याविषयी जाणुन घेणार आहोत.
ब्लू आधार कार्ड लहान मुलांसाठी बनवले जाते याला बाल आधार म्हणून देखील ओळखले जाते. भारत सरकारने लहान मुलांसाठी ब्लू आधार कार्ड जारी केले आहे. आधार कार्ड ज्याप्रमाणे आपल्या साठी उपयोगी पडते त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील ब्लू आधार कार्ड खूपच उपयोगी पडते. याचा अनेक कामात उपयोग केला जातो. ब्ल्यू आधार कार्ड लहान मुलांचे शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या योजनेत सहभागी होण्यासाठी उपयोगी पडते.
कसे बनवले जाते ब्ल्यू आधार कार्ड
ब्ल्यू आधार कार्ड बनवण्यासाठी लहान मुलांच्या आई-वडिलांपैकी एका व्यक्तीला जवळच्या आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल. तसेच लहान मुलांचे ब्ल्यू आधार कार्ड बनवण्यासाठी माता पिता चे आधार कार्ड असणे अनिवार्य असते.
आधार केंद्रावर गेल्यानंतर ब्लू आधार कार्डसाठी फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मसोबत लहान मुलांचे जन्म प्रमाणपत्र देखील जमा करावे लागते. लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी मातापित्यांच्या रहिवासाचा पुरावा जमा करावा लागतो. यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड अथवा पासपोर्ट यापैकी एक दस्तऐवज जमा करावे लागते.
Share your comments