DA Hike :- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वेतन आयोग या मुद्द्यांना खूप महत्त्व असते. याबाबत आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाते. यामधील पहिला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यात वाढवला जातो व दुसऱ्या दरवाढीनुसार हा वाढीव महागाई भत्ता एक जुलैपासून कर्मचाऱ्यांना लागू होतो.
परंतु यामध्ये दोन्ही वेळा जी काही घोषणा होते ती दोन ते तीन महिने उशिरा केली जाते. महागाई भत्त्यातील वाढ ही एआयसीपीआय निर्देशांकाची जी काही आकडेवारी असते त्या आधारे ठरते. जानेवारी ते जून या कालावधीमध्ये जर आपण ए आय सी पी आय निर्देशांकाचा आधार घेतला तर महागाई भत्त्याचा आकडा हा तीन अंकाच्या वर जात आहे.
परंतु महागाई भत्ता वाढीमध्ये सरकारच्या माध्यमातून दशांश बिंदूचा विचार केला जात नाही. त्यामुळे महागाई भत्त्यात तीन टक्याचे वाढ होणे अपेक्षित असून तो 42 वरून 45% पर्यंत वाढेल अशी एक अपेक्षा आहे. हा वाढीव महागाई भत्ता एक जुलैपासून कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
घरभाडेभत्त्यात देखील होईल वाढ?
येणाऱ्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या घर भाडेभत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा महागाई भत्ता हा 50 टक्क्यांच्या पुढे जातो तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढ होणे अपेक्षित असते. त्यामुळे याकरिता अजून तरी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. घर भाडे भत्ता हा शहरांच्या कॅटेगिरी नुसार कर्मचाऱ्यांना दिला जातो.
यामध्ये एक्स, वाय आणि झेड अशा श्रेण्या देण्यात आले असून एक्स श्रेणीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा घर भाडे भत्ता मिळतो तर त्या तुलनेत वाय आणि झेड या श्रेणीच्या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक्स श्रेणी कर्मचाऱ्यांपेक्षा कमी घरभाडे भत्ता मिळतो. साधारणपणे तो शहरानुसार विचार केला तर 27%, 18% आणि 9% अशा पद्धतीने सध्या मिळत आहे.
Share your comments