1. इतर बातम्या

जन धन खातेधारकांसाठी मोठी बातमी; बॅलन्सशिवाय मिळणार 10,000 रुपयांचा लाभ!

प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (PMJDY) खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. सर्व जन धन खातेधारकांना अशा सुविधेबद्दल माहिती असायला हवी जी तुम्हाला बँकिंग सेवांसह अनेक आर्थिक लाभ देते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Jan Dhan account

Jan Dhan account

प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (PMJDY) खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. सर्व जन धन खातेधारकांना अशा सुविधेबद्दल माहिती असायला हवी जी तुम्हाला बँकिंग सेवांसह अनेक आर्थिक लाभ देते.
रु. 10,000 पर्यंत मिळवा (Avail up to Rs 10,000)
या शून्य शिल्लक खात्यात तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा मिळू शकते. ओव्हरड्राफ्ट मर्यादा आधी 5,000 रुपये होती जी आता दुप्पट करून 10,000 रुपये करण्यात आली आहे. ज्यामध्ये 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट कोणत्याही अटीशिवाय उपलब्ध आहे.

कोण लाभ घेऊ शकतो (Who can avail this service of PMJDY)

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते कमीत कमी 6 महिने जुने असले पाहिजे, अन्यथा तुम्हाला फक्त रु.2,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट मिळू शकते. दरम्यान ओव्हरड्राफ्टसाठी वयोमर्यादाही ६० वरून ६५ वर्षे करण्यात आली आहे. PMJDY ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती.
बँकिंग, रेमिटन्स, क्रेडिट, विमा, पेन्शन यासारख्या आर्थिक सेवांमध्ये लोकांना परवडणाऱ्या दरात प्रवेश मिळावा यासाठी PMJDY राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले.

हेही वाचा : Aadhar Update: आधारकार्डला पॅनकार्ड लिंक आहे की नाही करा असे चेक, जाणुन घ्या याविषयी

PMJDY अंतर्गत लाभ (Benefits under PMJDY)

बँक नसलेली व्यक्ती मूलभूत बचत बँक खाते उघडण्यास सक्षम आहे.
PMJDY खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही.
PMJDY खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते.

PMJDY खातेधारकाला रुपये डेबिट कार्ड दिले जाते. PMJDY खातेधारकांना जारी केलेल्या रुपे कार्डसह 1 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देखील उपलब्ध करून दिले जाते. पात्र खातेधारकांसाठी 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे.

English Summary: Big news for Jan Dhan account holders; Benefit of Rs. 10,000 without balance! Published on: 04 January 2022, 10:15 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters