
Ajit Pawar
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यानतरं पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्यासोबतच अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहचले आहेत. दरम्यान या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, या पार्श्वभूमिवर अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानावर बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार गटातील सर्व प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Share your comments