नवी दिल्ली : १ सप्टेंबरपासून असे काही बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि मासिक बजेटवरही होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्यामुळे होत असलेल्या बदलांबद्दल जागरुक असण्याचीही खूप गरज आहे.
एलपीजी सिलेंडरची किंमत
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किमती ठरवतात. अशा परिस्थितीत येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो.
ऑगस्टच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, या कालावधीत 14 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
हे ही वाचा: IMD Alert: आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा यलो अलर्ट
विमा पॉलिसी प्रीमियम स्वस्त होईल
१ सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे. IRDAI ने बनवलेल्या सामान्य विम्याच्या नियमात बदल केल्यानंतर ग्राहकांना आता एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी फक्त 20 टक्के कमिशन द्यावे लागणार आहे. त्यामुळे लोकांचा प्रीमियम कमी होईल.
हे ही वाचा: मोठी बातमी: राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती; या विभागात 78000 पदे भरणार
शेतकऱ्यांनो ‘ही’ प्रक्रिया केली तरचं मिळणार 50 हजारांचे अनुदान; जाणून घ्या अंतिम मुदत
Share your comments