1. इतर बातम्या

Best Mileage Bikes| 'या' आहेत भारतातील सर्वात दमदार मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणुन घ्या याविषयी

Best mileage bikes in India: देशातील मध्यमवर्गीय लोक नेहमीच चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक वापरणे पसंत करत असतात. पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असताना आता अनेक मध्यमवर्गीय दमदार मायलेज च्या गाड्या विकत घेताना बघायला मिळत आहेत. अलीकडे देशात सर्वत्र इलेक्ट्रिक बाइक ची मागणी वाढली आहे मात्र असे असले तरी अजूनही असे अनेक शौकीन लोक आहेत ज्यांना पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक बाइक च्या तुलनेत अधिक आवडतात त्यामुळेच की काय अजूनही देशात सर्वत्र पेट्रोल बाईक ची मोठी डिमांड आहे. आज आपणदेशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या तसेच दमदार मायलेजच्या बाईक्सची यादी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
best bikes in india

हेही वाचा:-लई भारी! फक्त 50 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti Alto CNG; जाणून घ्या या ऑफर विषयी सविस्तर

हिरो स्प्लेंडर प्रो(Hero Splendor Pro): हिरो ही देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी आहे. या कंपनीची हिरो स्प्लेंडर प्रो ही बाइक देशात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टू व्हिलर गाड्यांच्या यादीत नेहमीच बघायला मिळत आहे. ही बाईक आपल्या स्टायलिश लुक मुळे आणि दमदार मायलेज मुळे मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत आहे. कंपनीच्या मते ही बाईक 90 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यात सक्षम आहे. हिरो स्प्लेंडर प्रो या गाडीची दिल्लीमध्ये सुरवातीची एक्स शोरूम किंमत 49 हजार 500 रुपये एवढी आहे.

या गाडीमध्ये कंपनीने 97.2 CC इंजिन उपलब्ध करून दिले आहे. हे इंजिन 8.24 bhp पावर जनरेट करण्यास सक्षम असून 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने ही गाडी चार स्पीड गिअर बॉक्स सोबत उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा:- काय सांगता! फक्त 8 हजार रुपये डाउनपेमेंट भरून आता मिळणार हिरो स्प्लेंडर प्लस; जाणून घ्या या विषयी सविस्तर

Bajaj CT 100: बजाज CT 100 ही बजाज कंपनीची सर्वात दमदार बाईक पैकी एक आहे. या गाडीला देखील भारतातील सर्वाधिक मायलेज देणार्‍या बाईक्सच्या यादीत ठेवले जाते. बजाज CT100 ही गाडी एका वैरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

CT100 ES अलॉय ड्रमच्या व्हेरियंटमध्ये ही गाडी कंपनीने विक्रीसाठी ठेवली आहे. या गाडीची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 53,696 रुपये एवढी आहे. ही गाडी 89 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मायलेज ARAI द्वारा प्रमाणित करण्यात आले आहे. या बाईकमध्ये 102 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे सुमारे 8 hp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा आहे.

हेही वाचा:-आनंदाची बातमी! 'या' ठिकाणी बजाज प्लॅटिना मिळतेय फक्त 15 ते 25 हजाराच्या दरम्यान; जाणून घ्या ही आकर्षक डील

English Summary: Best Mileage Bikes These are the most powerful mileage bikes in India; Learn about it Published on: 13 March 2022, 12:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters