गुंतवणूक आणि भविष्य यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. भविष्यासाठी केलेली गुंतवणूक ही आपले भविष्य उज्वल करू शकते. परंतु गुंतवणूक तेव्हा शक्य होते जेव्हा आपण बचत करू शकू.अशा गुंतवणुकीच्या बऱ्याच योजना विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. त्याद्वारे अशा योजनांमध्ये पैसे गुंतवून आपले भविष्यवआपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करता येते. जर आपल्या मुलांचा विचार केला तर मुलांचे किंवा मुलींचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न यासाठी भरपूर प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे चांगल्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे असते.
या लेखात आपण अशीच एक योजना तुझे खास करुन मुलींसाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकार कडून चालवली जाते अशा सुकन्या समृद्धी योजना विषयी या लेखात माहिती घेणार आहोत.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना?
या योजनेमध्ये खाते हे किमान दोनशे पन्नास रुपये भरून उघडता येते.या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती एका वर्षातकमीत कमी दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करु शकते. या खात्यात एकरकमी किंवा हप्त्यात रक्कम जमा केली जाऊ शकते. खाते उघडल्यानंतर पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते.
मुलगी दहावी पास झाल्यानंतर किंवा तिच्या अठरा वर्षे पूर्ण झाले कि आपण त्यातील काही पैसे काढू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्ष आहे. या योजनेमध्ये दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकवर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळतेतसेच या योजनेत गुंतवणूक करून कलम 80 सी अंतर्गत हा लाभ घेता येतो.
या योजनेचे महत्त्वाची वैशिष्ट्ये
सुकन्या समृद्धी योजना खाते सहजपणे एका बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करता येऊ शकते.त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागतो व तो संबंधित पोस्ट किंवा बँकेत आवश्यक कागदपत्रं सादर करावा लागतो.त्याच्यानंतर तुमचे खाते आहे दुसऱ्या बँकेत पोस्ट ऑफिस मध्ये सहजरीत्या ट्रान्सफर होते.
2- मुलींसाठी गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना सर्वोत्तम आहे.
3- या योजनेत जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते.
4-
या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करतात.
5- सरकारच्या सर्व बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजना वरील व्याजदर अधिक आहे.
या योजनेचा व्याज दर
सरकारच्या सर्व बचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजना वरील व्याजदर जास्त आहे.सुकन्या समृद्धी योजना वरील व्याजदर हा 6.6 टक्के आहे तसेच हा व्याजदर कंपाऊंड वार्षिक आहे. सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीस व्याजदर जाहीर करते.
Share your comments