नवी दिल्ली : बँकेने कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. HDFC बँकेने गुरुवारी २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार नवीन दर 18 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहेत.
एचडीएफसी बँकेने निवडक कालावधीत व्याजदरात 40 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या पतधोरण बैठकीत रेपो दरात 50 आधार अंकांनी वाढ केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.
बँक सध्या सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर व्याजदर देत आहे. यामध्ये सर्वसामान्यांसाठी 2.75 टक्के ते 5.7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.2 टक्के ते 6.5 टक्के व्याज देण्यात येत आहे.
हे ही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, महागाई भत्त्यात वाढ
एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, “बँक एका वर्षातील वास्तविक दिवसांच्या आधारे व्याजाची गणना करते. जर ठेव लीप वर्ष आणि सामान्य वर्षात असेल, तर व्याज दिवसांच्या संख्येच्या आधारावर मोजले जाते, म्हणजे लीप वर्षातील 366 दिवस आणि सामान्य वर्षात 365 दिवस, तर मुदत ठेवीचा कालावधी दिवसांच्या संख्येनुसार मोजला जातो.
हे ही वाचा: ई-पीक पाहणीच्या नवीन अॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
Share your comments