1. इतर बातम्या

20 रुपयांत अकाउंट, 8 टक्के व्याज; दमदार परतावा देणाऱ्या पोस्टाच्या स्कीम

मुंबई- सुरक्षित व योग्य परतावा देणारी गुंतवणूक सर्वांना हवी असते. योग्य माहितीचा अभावामुळे गुंतवणुकीच्या माहितीपासून अनेकजण वंचित राहतात. खात्रीशीर गुंतवणूकीतुन उत्तम परतावा साठी पोस्ट ऑफिसच्या योजनांना अनेक जण पहिली पसंती देतात.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
post office

पोस्ट सेव्हिंग अकाउंट

पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ 20 रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.

रिकरिंग अकाउंटमध्ये मात्र 8.4 टक्के व्याज दिलं जातं. ही योजना एप्रिल 2014 पासून लागू करण्यात आलीय. प्रत्येक महिन्याला कमीत कमी 10 रुपयांनी ही योजना तुम्ही सुरू करू शकता. जास्तीत जास्त रकमेची मात्र मर्यादा नाही. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक 8.4 टक्के व्याज मिळतं.

टाइम डिपॉझिट स्कीम

टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीत कमी 200 रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली चार वर्ष 8.4 टक्के व्याज मिळतं. तर पाचव्या वर्षी 8.5 टक्के व्याज मिळतं. वार्षिक रुपात व्याज मिळतं. योजनेत मिळणारं व्याज (उत्पन्न) संपूर्णत: करमुक्त असतं.

 सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम

 वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षांसाठी आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतो. यावर, शिल्लक असलेल्या रकमेवर 9 टक्के व्याज मिळतं. शिवाय, इन्कम टॅक्स अॅक्ट कलम 80 सी नुसार लाभार्थींना टॅक्समध्येही सूट मिळते.

 मासिक उत्पन्न योजना

 या योजनेंतर्गत तुम्हाला 8.40 टक्के दरानं व्याज मिळतं. परंतु, हा दर स्थिर नाही. या दरात दरवर्षी बदल होतो. सहा वर्षांत तुमचं अकाऊंट मॅच्युअर होतं. व्याजाचे पैसे प्रत्येक वर्षी तुमच्या अकाऊंटमध्ये जोडली जातात. या खात्यात कमीत कमी 1500 रुपये ठेवणं जरुरी आहे.

 सुकन्या योजना

 पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्या मुलींकरता आहे. यामध्ये, तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही खातं उघडू शकता. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही 1,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सद्य आर्थिक वर्षात 9.2 टक्के व्याज दिलं जातंय. खातं उघडल्यानंतर 14 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता.

English Summary: attractive investment schemes of post office Published on: 22 September 2021, 09:43 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters