बऱ्याचदा कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे बँकेत असलेल्या खात्यात असलेल्या पैशांचे काय होते हा प्रश्न पडतो. अशा मृत झालेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड किंवा पिन नंबर वापरून आपण त्याच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.कारण हा एक दंडनीय अपराध आहे.
त्यामध्ये जर तुम्ही संबंधित व्यक्ती सोबत संयुक्त खातेदार असाल तर तुम्ही पैसे काढू शकता. अन्यथा तुम्हाला तो अधिकार नाही.मग आपल्याला प्रश्न पडतो की अशा खात्यातून पैसे कसे काढता येतील? त्याबद्दल आपण या लेखात सविस्तर जाणून घेऊ.
बँक खाते उघडताना आपण फार्म भरताना नॉमिनी चे नाव टाकतो. नॉमिनी निवडणे हे फार महत्वाचे आहे कारण बँक खात्यात नाव नोंदणी केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबाला होणारा पुढचा त्रास टाळता येऊ शकतो. काही तरुण वयात बँकेत खाते उघडले जातात ते आता ज्येष्ठ असतात त्यांनी नाव नोंदणी केली नसावी,तरी त्यांनी नामनिर्देशित व्यक्ती घोषित केले असावे. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, जर एखाद्या व्यक्तीचा बचत खात्यात नाव नोंदवल्या शिवाय मृत्यू झाला तर काय होते? मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याचे काही मार्ग आहेत.ते आपण जाणून घेऊ.
मृत व्यक्ती सोबत संयुक्त खाते असणे..
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यामुळे व्यक्तीसोबत संयुक्त खाते असेल तर संबंधित खात्यातील रक्कम दुसरी व्यक्ती काढू शकते. कारण संपूर्ण रक्कम संयुक्त धारकांकडे हस्तांतरित केली जाते. अशा स्थितीमध्ये खात्यातून मृत व्यक्तीचे नाव काढून टाकण्यासाठी त्याचा मृत्यू प्रमाणपत्राची प्रत संबंधित बँक शाखेत जमा करावी लागते. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव संयुक्त खात्यातून काढून टाकण्यात येते.
आपण नामांकित असल्यास?
जर तुम्ही नॉमिनी असाल तर बँक खात्यात उपलब्ध असलेले पैसे नॉमिनी ला दिले जातात. पैसे सुपूर्द करण्यापूर्वी, बँक नामनिर्देशन तसेच मृत्यू प्रमाणपत्र चे मूळ प्रत सत्यापित करते.
नामांकन आवर वाद असल्यास आणि मृत्युपत्राचे प्रत बँकेकडे असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया थोडी लांब पद्धतीचे असू शकते. पैसे मिळाल्याचे वेळी मूळ नॉमिनी ला पैसे दिले गेले आहेत याची खात्री करण्यासाठी बँक दोन साक्षीदारांना विचारते.
नॉमिनी नसेल तर?
जर एखाद्या खात्यात नोमिनी नसेल तर पैसे मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला दीर्घ अशा कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. त्याला मृत्युपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र द्यावे लागते.ज्याद्वारे सिद्ध करता येते की त्याला मृताचे पैसे मिळाले पाहिजेत.(संदर्भ-वेबदुनिया)
Share your comments