1. इतर बातम्या

ऐकलं का! 15 मार्चपर्यंत 'या' राशींच्या लोकांचे होणार मंगलच मंगल; पाय माराल तिथं पाणी काढालं

देशात अनेक लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असतात, यामध्ये सूर्यदेवाला एक विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यदेव अर्थात सर्व ग्रहांचा राजा. सुर्य हा ग्रह आत्मा, पिता, सन्मान, यश प्रगती सरकारी गैरसरकारी इत्यादी क्षेत्रात उच्च श्रेणीचा कारक म्हणून ओळखला जातो. असे सांगितले गेले आहे की 15 मार्चपर्यंत सूर्यदेव कुंभ राशीत घर करून बसेल, यामुळे काही राशीच्या लोकांवरचांगला परिणाम बघायला मिळू शकतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image credit- whats your sign

image credit- whats your sign

देशात अनेक लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असतात, यामध्ये सूर्यदेवाला एक विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सूर्यदेव अर्थात सर्व ग्रहांचा राजा. सुर्य हा ग्रह आत्मा, पिता, सन्मान, यश प्रगती सरकारी गैरसरकारी इत्यादी क्षेत्रात उच्च श्रेणीचा कारक म्हणून ओळखला जातो. असे सांगितले गेले आहे की 15 मार्चपर्यंत सूर्यदेव कुंभ राशीत घर करून बसेल, यामुळे काही राशीच्या लोकांवरचांगला परिणाम बघायला मिळू शकतो.

यासंदर्भात मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया 15 मार्चपर्यंत कोणत्या राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा राहणार आहे.

मेष: ज्या राशींवर 15 मार्चपर्यंत सूर्यदेवाची विशेष कृपा राहणार आहे, त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे मेष. या राशीतील लोकांसाठी नोकरीमध्ये चांगला सुविचार मिळण्याची आशा आहे अनेकांना नोकरीत पदोन्नती देखील होऊ शकते. पारिवारिक दृष्टिकोनातून देखील 15 मार्च पर्यंत या राशीतील लोकांना आनंद मिळणार आहे, कुटुंबात क्लेश, भांडण होणार नाही. सर्वत्र आनंदी आनंद राहणार आहे. एवढेच नाही तर महिनाअखेरपर्यंत एखादी मोठी चांगली बातमी आपल्या कानावर पडू शकते. भाग्य आपल्या बाजूने आहे, आर्थिक परिस्थिती देखील मजबूत राहणार आहे. वैवाहिक जीवन सुखाचे होणार आहे, या व्यतिरिक्त आपण धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. कामात मोठे यश मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वृषभ: या राशीतील लोकांसाठी देखील 15 मार्चपर्यंत सूर्यदेवाची विशेष कृपा आहे. परिवाराकडून एखादा सुखद समाचार आपणास प्राप्त होऊ शकतो. आपणास आपण करत असलेल्या कामात मोठे यश मिळेल. पैसे येण्याचे योग आहेत म्हणून आर्थिक बाजू खंबीर बनेल. भाग्य आपल्या बाजूने आहे वैवाहिक जीवनात आनंदी आनंद बघायला मिळेल.

मिथुन: या राशीतील लोकांवर सूर्य देवाची कृपा राहणार आहे. असे असले तरी या राशीतील लोक सध्या करत असलेली नोकरी बदलण्याच्या विचारात असतील. व्यवसायात लाभ होण्याचे संकेत आहेत तसेच कामात देखील मोठी यशप्राप्ती होऊ शकते. व्यवसाय आणि नोकरीत मोठी प्रगती होणार आहे आपण आपला अनमोल वेळ आपल्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. या कालावधीत सर्व जण आपल्या मदतीसाठी इच्छुक असतील.

मकर: सूर्यदेव मान सन्मानाचा स्वामी आहे म्हणून आपली प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. घरात देखील मोठे आनंदाचे वातावरण या वेळी बघायला मिळणार आहे. नोकरी तसेच व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा महिना आपल्यासाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. मनाला मोठी शांती लाभणार असून आर्थिक बाजू आपली मजबूत होणार आहे. आपल्या परिवाराचे विशेषता आपल्या जोडीदाराचे आपल्याला साथ भेटणार आहे. यश प्राप्ती साठी जास्त मेहनत आपणास घ्यावी लागणार नाही, असे असले तरी मेहनत यशाची गुरुकिल्ली आहे हे ध्यानात घ्यावे.

Disclaimer: सदर लेखात दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. Krishi Jagran Marathi लेखात दिलेल्या माहितीची कोणतीच हमी घेत नाही. आमच्या वाचक मित्रांच्या आवडीनुसार हा लेख तयार करण्यात आला आहे.

English Summary: astrology says this march month is very benificial for these four rashi Published on: 04 March 2022, 01:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters