एफपीसी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप आहे. शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 1956 व 2013 नुसार होते. शेतकरी उत्पादक कंपनी ची नोंदणी करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कागदपत्रे लागतात. त्या कागदपत्रांची विषयी या लेखात माहिती घेऊ.
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
हेही वाचा : पीएम किसान एफपीओ योजनेमुळे शेतकऱ्यांना होईल अनेक फायदे
-
प्रत्येक संचालक आणि सभासदांचे स्वतः प्रमाणित केलेले पॅनकार्ड आणि आधारकार्ड किंवा प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.
-
तसेच प्रत्येक संचालकांनी सभासदाचा स्वतः प्रमाणित केलेले बँक स्टेटमेंट किंवा स्वतःच्या नावावर असलेले चालू वीजबिल रहिवासी पुरावा साठी दोन्हीपैकी एक आवश्यक आहे.
-
प्रस्तावित कंपनीसाठी कमीतकमी ६ योग्य नावे असावे.
-
कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चालू वीजबिल तसेच ऑफिस मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
-
प्रत्येक संचालक आणि सभासदांचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शैक्षणिक पात्रता विषयची कागदपत्रे, जन्माचे ठिकाण इत्यादी बाबतची पुरावे.
-
पॅनकार्ड, आधारकार्ड, आयडिया आणि एड्रेस प्रूफ आणि सातबारा उतारा यांची स्कॅन कॉपी ही ओरिजिनल असावे.
-
प्रत्येक संचालक आणि सभासदाचा शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी तलाठ्याच्या सही शिक्कासह सातबारा उतारा आणि तहसीलदाराच्या सही शक यासह शेतकरी असल्याचा दाखला असणे आवश्यक.
-
सातबारा उतारा सभासदाच्या स्वतःच्या नावावर नसेल तर नातेवाईकाचा सातबारा उतारा आणि तहसीलदाराच्या सही शिक्का सह फार्मर सर्टिफिकेट आवश्यक.
-
प्रत्येक संचालक आणि सभासदांचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो.
शेतकरी उत्पादक कंपनी ही अशी संस्था आहे की तिचे सदस्य हे केवळ शेतकरी असतात. शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान शेतकऱ्यांचे गट एकत्रित आणले जातात. परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात. तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत एक प्रभावी संघटना तयार करणे, जसे की गुंतवणूक करणे, नवीन बाजारपेठ, उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवणे, कंपनीमार्फत खरेदी विक्री केंद्र उभारणे बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे इत्यादी प्रकारची कामे शेतकरी उत्पादक कंपनी करते.
संदर्भ- कृषी क्रांती
Share your comments