आता शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. योजनेसाठी कसा अर्ज करावा. कुठून करावा या समस्या राहणार नाहीत. कारण टपाल विभागाने (Department Of Post) एक योजना आणली आहे, या योजनेमुळे टपाल कार्यालयात केंद्र सरकारचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची सामन्य नागरिकांसाठी असलेल्या ७३ सुविधांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान बिहारमध्ये ३०० टपाल कार्यालयात पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
पंतप्रधान यांच्या योजनांशी संबंधित सर्व योजनांची नोंदणी टपाल कार्यालयात सुरु करण्यात येणाऱ्या सीएससी मध्ये केली जाईल. जर प्रधानमंत्री जनधन खाते उघडायचे असेल किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची नोंदणी करायची असेल सर्व योजनांची नोंदणी येथे केली जाईल. इतकेच नाही तर शेतकरी पीक विम्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनांता लाभही घेऊ शकतील. पंतप्रधान आवास योजनेची नोंदणीही केली जाणार आहे.
याशिवाय या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये आधार कार्ड बनवता येणार यासह आधार कार्डचे अपडेट केले जाणार आहे. मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिकेत मिळत असते. परंतु टपाल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही हे प्रमाणपत्र मिळणार आहे. पेन्शन धारकांनाही दर वर्षी जीवन प्रमाणपत्र (Life certificate) द्यावे लागते. आता हे प्रमाणपत्र टपाल कार्यालयात मिळणार आहे. यासह पाणी आणि वीज बिल, गॅसचे बिल पण येथे जमा केले जातील. इतकेच काय राष्ट्रीय महामार्गावरील टोल देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फास्टॉगचा रिचार्ज येथे केले जाईल.
Share your comments