आयुषमान भारत या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा मोफत पुरवली जाते. आता ही योजना फक्त गरीब लोकांपर्यंत सीमित राहणार नाही. या योजनेचा फायदा जे गरिबी रेषेच्या वरती असलेल्या वर्गाला ही लाभ मिळणार आहे. आयुषमान भारत या योजनेच्या माध्यमातून देशातील १०. ७४ कोटी कुटुंबांना वर्षिक ५ लाख रुपयांपर्यत उपचार मोफत दिला जातो. नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) ने आता या योजनेला 'the missing middle' म्हणजे ज्या वर्गापर्यंत ही योजना पोहोचत नाही त्या वर्गांना आयुषमान भारत योजनेचा लाभ पोहचवला जाणार आहे.
असंघटित क्षेत्रात काम करणारे सेल्फ इम्पलाईड, व्यावसायिक किंवा छोटे-मोठ्या उद्योजकांना यासह MSMEs संबंधित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या मते, या योजनेला the missing middle पर्यंत पायलय प्रोजेक्टने पोहचवले जाणार आहे. त्यानंतर कळेल की, ही योजना या वर्गात किती प्रमाणात यशस्वी झाली हे समजेल.
सर्वांना मिळणार या योजनेचा लाभ - यासह नॅशनल हेल्थ अथॉरिटी बोर्डाने कर्मचाऱ्यासाठी असलेली आरोग्य योजनेला आयुषमान भारत प्रधामंत्री जन आरोग्य योजनेत ( Ayushman Bharat-PMJAY) विलिन करण्यास परवानगी दिली आहे. यात कंत्राटी आणि नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश यात करकम्यात आला आहे. या अंतर्गत बांधकाम करणारे मजूर, सफाई कर्मचारी, रस्ते अपघात जखमी झालेले व्यक्ती, याचाही समावेश होणार आहे.
Share your comments