
amazon prime day sale 2022 start from tommarow til 24 july
स्मार्टफोन प्रेमींसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे ॲमेझॉन प्राईम डे 2022 सेलची सुरुवात 23 जुलै अर्थात उद्यापासून होत असून 24 जुलैपर्यंत हा सेल चालणार आहे.हा सेल प्राईम मेंबर्स असलेल्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या ॲमेझॉन प्राईम डे 2022 सेल मध्ये एक्सचेंज डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय हे पर्याय देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी ॲमेझॉनकडून आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत भागिदारी करण्यात आली असून युजर्सना कार्ड किंवा ईएमआय ट्रांजेक्शनवर दहा टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.
'या' स्मार्ट फोनवर विशेष सूट
1- वन प्लस नॉर्ड CE 2 5G-हा फोन फेब्रुवारीमध्ये 23 हजार 999 रुपयाच्या किमतीत लॉन्च झाला होता.या ॲमेझॉन प्राईम डे 2022 सेलमध्येहा फोन 22499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.तसेच यावर अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे.
2- रेडमी नोट 11- हा फोन ॲमेझॉनच्या साईटवर फक्त दहा हजार 749 रुपयाला लिस्ट करण्यात येणार आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला होता. या सेलमध्ये हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो.
नक्की वाचा:नियमित कर्जदारांना 50 हजार अनुदान मिळालेच पाहिजे यासाठी सांगली येथे भव्य मोर्चा
3- ऍपल आयफोन 13- हा स्मार्टफोन 2021 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. या आयफोन सेल मध्ये 66 हजार 900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर त्या आयफोन मॉडेलची देवाण घेवाण करून ग्राहकांना अतिरिक्त सवलतींचा फायदा मिळू शकणार आहे.
Share your comments