भारत सरकार मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी तसेच त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी नेहमीच कार्यरत असते. त्या अनुषंगाने सरकार दरबारी अनेक योजना विचाराधीन असतात तर काही योजना अमलात आणल्या गेलेल्या असतात. भारतातील मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी अटल पेन्शन नामक एक योजना अमलात आणली आहे. या योजनेद्वारे नवरा-बायको दोघांना दहा हजार रुपये पेन्शन दिले जाते. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत जर आपण अजून सहभाग नोंदवला नसेल तर लवकरात लवकर या योजनेत सामील व्हा आणि योजनेचा लाभ घ्या.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2021-22 या वित्तीय वर्षात या योजनेत जवळपास 65 लाख भारतीय नागरिक जोडले गेले आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून एका आर्थिक वर्षात सर्वात जास्त एनरोलमेंट 2021-22 या आर्थिक वर्षात झाली आहे.
या योजनेत 3.68 कोटी लोक झालेत सहभागी
भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये अटल पेन्शन योजना लाँच केली होती. या योजनेचे उद्दिष्ट मध्यमवर्गीय लोकांना वृद्धापकाळात मदत करणे असे आहे. 2015 पासून ते आजतागायत या योजनेत देशातील जवळपास तीन कोटी 68 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
पीएफआरडीए चे वर्तमान अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय यांनी सांगितले की, या चालू वित्तीय वर्षात एक कोटी लोकांना या योजनेत सहभागी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेद्वारे येत्या काळात या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पेन्शन वेळेवर दिले जाणार आहे. त्यासाठी सरकार दरबारी कार्य प्रगतीपथावर आहे.
काय आहेत या योजनेच्या अटी
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी 18 ते 40 या दरम्यान असलेले वयोगटातील सर्व भारतीय नागरिक सहभाग नोंदवू शकतात. ज्या व्यक्तींना या योजनेत सहभाग नोंदवायचा आहे त्या व्यक्तीकडे बँकेचे पासबुक असणे अनिवार्य आहे.
या योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1000 रुपये पासून ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचे नमूद करण्यात आले आहे. जर या योजनेच्या अर्जदाराचे निधन झाले तर योजनेअंतर्गत अर्जदाराच्या पती किंवा पत्नीस आजीवन पेन्शन मिळत राहणार आहे. जर पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर पेन्शनचा संपूर्ण पैसा नॉमिनीला देण्यात येतो.
Share your comments