1. इतर बातम्या

काय सांगता! या पट्ठ्याने टोमॅटोच्या एका झाडावर सर्वाधिक टोमॅटो पिकवण्याचा विक्रम बनवला, एकाच झाडाला लागले तब्बल 5,891 टोमॅटो

Agriculture News : शेतकरी (Farmer) कधी काय करेल याचा काही नेम नाही. अनेकदा शेतकरी आपल्या अनोख्या कामामुळे चर्चेत येत असतात. ब्रिटनमध्ये (Britain Viral Farmer) देखील अशीच एक घटना घडली आहे. ब्रिटेनमधील एक शेतकरी सध्या आपल्या अनोख्या कामामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ब्रिटनमधील एका हौशी शेतकऱ्याने टोमॅटो पिकवण्याचा (Tomato Farming) अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
britain viral farmer

britain viral farmer

Agriculture News : शेतकरी (Farmer) कधी काय करेल याचा काही नेम नाही. अनेकदा शेतकरी आपल्या अनोख्या कामामुळे चर्चेत येत असतात. ब्रिटनमध्ये (Britain Viral Farmer) देखील अशीच एक घटना घडली आहे. ब्रिटेनमधील एक शेतकरी सध्या आपल्या अनोख्या कामामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ब्रिटनमधील एका हौशी शेतकऱ्याने टोमॅटो पिकवण्याचा (Tomato Farming) अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या शेतकऱ्याचा दावा आहे की त्याने एका टोमॅटोच्या रोपावर सर्वाधिक टोमॅटो उत्पादित करण्याचा विक्रम केला आहे. यूकेच्या हर्टफोर्डशायरमध्ये एका व्यक्तीने टोमॅटोच्या एकाच वेलीवर 5,891 टोमॅटो पिकवले असल्याचा दावा केला आहे. यामुळे हा शेतकरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय (Viral News) ठरत आहे. डग्लस स्मिथ नामक 44 वर्षाच्या शेतकऱ्याने हा दावा केला आहे.

डग्लस स्मिथ यांनी लाल आणि हिरव्या टोमॅटोची गणना केली असता त्या झाडावरील सर्व टोमॅटोचे एकूण वजन 20 किलोपेक्षा जास्त भरले. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, यापूर्वी एकाच वेलीमध्ये सर्वाधिक टोमॅटो पिकवण्याचा विक्रम मिडलँड्सच्या कॉव्हेंट्री येथील सुरजित सिंग कैंथ यांच्या नावावर होता. सुरजीत यांनी एका वेलीवर 1,344 टोमॅटो पिकवले होते.

दरम्यान, हॅम्पशायरमधील एका हौशी माळीने जगातील सर्वात मोठी काकडी पिकवली आहे. त्यांच्या या पराक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सेबॅस्टियन सुकी यांनी 3 फूट उंचीची काकडी वाढवली आहे जी बाजारात उपलब्ध असलेल्या सरासरी काकडीच्या तुलनेत चौपट मोठी आहे. त्याच वेळी, त्याचे वजन 20 पट जास्त आहे. सर्वात मोठे टोमॅटो उत्पादक डग्लस स्मिथ यांनी यापूर्वी 20 फूट उंच सूर्यफूल वनस्पती वाढवून विक्रम केला आहे.

टोमॅटोने अधिकृत विक्रम करणे अपेक्षित आहे

स्मिथ हा एक आयटी व्यवस्थापक आहे जो स्टॅनस्टेड अॅबॉट्स, हर्टफोर्डशायर येथे त्याचा मुलगा स्टेलन आणि पत्नी पाइपरसह राहतो. छंद म्हणून तो शेती करतो. यावेळी त्याला टोमॅटो पिकवल्यावर अधिकृत मान्यता मिळेल, अशी आशा आहे. मात्र, टोमॅटो पिकवण्याचा त्याचा विक्रम आणखी दोन साक्षीदारांनीही पाहिला आहे. 2020 मध्ये, स्मिथ त्याच्या घरापेक्षा उंच असलेल्या 20 फूट उंच सूर्यफूलची वनस्पती वाढवून प्रसिद्धीच्या झोतात आला. ही यूके मधील सर्वात मोठी सूर्यफूल वनस्पती होती.

त्याला स्वतः विश्वास बसत नाही

स्मिथ पुढे म्हणाला की, त्याने विक्रम करण्यासाठी टोमॅटोचे पीक घेतले होते. पण हा आकडा 6000 टोमॅटोच्या जवळपास पोहोचेल, अशी त्याला अपेक्षा नव्हती. मात्र, उष्णतेमुळे टोमॅटोच्या झाडाची काळजी वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 26 ऑगस्ट रोजी त्याने रोपातून टोमॅटो काढले आहेत.

English Summary: agriculture news a farmer grown highest tomato in one crop Published on: 03 September 2022, 07:05 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters