गरजू लोकांसाठी सरकार आपल्या योजना काढत असते जे की गरजूना याचा फायदा व्हावा पण काही लोक पात्र नाहीत तरीही या योजनांचा फायदा घेत आहेत आणि हे सरकार ला समजले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी बाबत असे काही प्रकार घडले असल्याचे समजले आहे. जे की पात्र नसलेल्या लोकांवर अत्ता कारवाई होणार आहे.
लाखो अपात्र लोकांनी घेतला लाभ:-
केंद्र सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून याची वसुली करणार आहेत त्यामध्ये कमीत कमी ४२ लाख अपात्र शेतकरी आहेत जे की ३ हजार कोटी रुपये वसूल होणार आहेत.त्यामध्ये उत्तरप्रदेश राज्यामधील अपात्र शेतकरी वर्गाकडून ७.१० लाख रुपयांची वसुली होणार आहे. जे अपात्र शेतकरी आहेत त्यांची चांगल्या पद्धतीने ओळख पटलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर पणे कारवाई केली जाणार आहे.
आता अशा लोकांकडून पैसे वसूल केले जाणार:-
सरकारने अपात्र शेतकऱ्यांच्या पंतप्रधान किसान सन्मान योजना निधीची रक्कम काढून घेण्यास सांगितले आहे तसेच या लोकांना या योजनेमधून वगळण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची ओळख पटवली आहे जे की त्या पद्धतीने त्याच्याकडून वसुली सुद्धा होणार आहे. आसाम मधील अपात्र शेतकरी वर्गाकडून ५५४ कोटी तर उत्तरप्रदेश राज्यातील अपात्र शेतकरी वर्गाकडून २५८ कोटी, बिहारमधील अपात्र शेतकरी वर्गाकडुन ४२५ कोटी तसेच पंजाब मधील अपात्र शेतकरी वर्गाकडून ४३७ कोटी वसूल केले जाणार आहेत. ३,८६,००० लोक आपले बनावट आधारकार्ड द्वारे या योजनेचा लाभ घेत आहेत. ५७,९०० शेतकरी आहेत ज्यांना वेगळ्या कारणांमुळे या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.
या लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही:
जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहात पण तुम्ही यास पात्र आहेत की नाही हे तुम्हाला माहीत असले पाहिजे त्यासाठी खाली दिलेली यादी तुम्ही वाचा.
१. शेतकरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कर भरला असेल तर त्यास या योजनेमधून वगळण्यात येणार आहे.
२. जर जमीन शेती योग्य नसेल तर त्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
३. जमीन तुमच्या नावावर नसून आजोबा किंवा इतर कोणाच्या नावावर अस्सल तर ते या योजनेस पात्र नसणार आहेत.
४. जमीन भाड्याने घेऊन शेती करत असाल तर ही योजना तुम्हाला भेटणार नाही.
५. तुम्ही जमीन तुमच्या नावावर असेल पण तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही या योजनेस पात्र नाहीत.
६. तुम्ही जर राजरकरण मध्ये आमदार, खासदार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
७. तुम्ही डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असाल तरीही तुम्ही या योजनेस पात्र नाही.
८. तुम्ही शेतकरी असून जर तुम्हाला १० हजार पेन्शन भेटत असेल तर तुम्ही या योजनेस पत्र नाहीत.
९. जर तुम्ही नगराध्यक्ष तसेच जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष असाल तर तुम्ही या योजनेस पात्र नाहीत.
Share your comments