1. इतर बातम्या

Important! अपघातात जखमीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवनाऱ्या व्यक्तीस मिळणार पाच हजार रुपयांचे बक्षीस

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एक तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये पोहोचणार यांसाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
hospitalization

hospitalization

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एक तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये पोहोचणार यांसाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे.

या योजनेच्या अनुषंगाने संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.

 या योजनेसंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना यासंबंधीचे पत्र लिहिले आहे.

 योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून 31 मार्च 2014 पर्यंत लागू असेल असेसांगण्यात आले आहे. मंत्रालयाने सोमवारी यासंबंधीची नियमावलीही जारी केली आहे. यासंबंधी मंत्रालयाने म्हटले आहे की, आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघात झालेल्या ना मदत करण्यासाठी  नागरिकांना प्रोत्साहन मिळावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 या योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कारा सोबतच एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

तसेच या पुरस्कारा व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर दहा सर्वात प्रामाणिक पणे सहकार्य करणाऱ्यांना एक एक लाख रुपयांचा पुरस्कार ही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

English Summary: acccident person rich in hospital those person give award five thousand rupees Published on: 05 October 2021, 01:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters